शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये पळून जायच्या तयारीत होता दीप सिद्धू; पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

By देवेश फडके | Updated: February 9, 2021 15:41 IST

दीप सिद्धू याची चौकशी केली जात असून, दीप सिद्धू बिहारमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देदीप सिद्धूची चौकशी सुरूबिहारमध्ये पळून जायच्या तयारी होता दीप सिद्धूपंजाबमधील करनाल येथून पोलिसांनी केली अटक

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी मुख्य आरोप असलेला पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याला पोलिसांनी अटक केली. दीप सिद्धू याची चौकशी केली जात असून, दीप सिद्धू बिहारमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. (crime branch told accused deep sidhus bihar and california connection)

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धू पंजाबमधून बिहारमध्ये फरार होण्याच्या तयारीत होता. बिहारमधील पूर्णिया येथे दीप सिद्धूची पत्नी आणि तिचे कुटुंबीय राहतात. दीप सिद्धूही तेथे जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याचवेळी विशेष पथकाने दीप सिद्धूला अटक केली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद

पोलिसांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या हिंसाचारानंतर दीप सिद्धू आपला मोबाइल बंद करून फरार झाला होता. यानंतर सोमवारी रात्री १०.३० वाजता दीप सिद्धूला करनाल येथून अटक करण्यात आले. रस्त्यावर एकटाच उभा असलेला दीप सिद्धू एका गाडीची वाट पाहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या हिंसाचारानंतर फरार झालेला दीप सिद्धू व्हिडिओ बनवत होता. मात्र, ते व्हिडिओ त्याची अतिशय जवळची एक महिला कॅलिफोर्निया येथून अपलोड करत होती. तपास संस्थेची दिशाभूल करण्यासाठी दीप सिद्धूने ही शक्कल लढवल्याचे सांगितले जात आहे. 

प्रजास्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलकांना भडकवण्याचा आरोप दीप सिद्धूवर ठेवण्यात आला आहे. या आंदोलकांनी लाल किल्ल्यामध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात शेकडो कर्मचारी जखमी झाले होते. या सर्व हिंसाचारासाठी दीप सिद्धूला जबाबदार धरण्यात आले आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीPoliceपोलिसRed Fortलाल किल्ला