शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

सीबीआयचा स्वत:च्याच विशेष संचालकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 06:20 IST

केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) या देशातील अग्रगण्य तपास यंत्रणेतील वरिष्ठांमधील सुंदोपसुंदी शिगेला पोहोचली

नवी दिल्ली: केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) या देशातील अग्रगण्य तपास यंत्रणेतील वरिष्ठांमधील सुंदोपसुंदी शिगेला पोहोचली असून, त्यातून या संस्थेने एका भ्रष्टाचार प्रकरणात आपलेच विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ‘सीबीआय’च्या सहा दशकांच्या इतिहासात ही ‘न भूतो’ अशी घटना आहे.‘सीबीआय’मध्ये संचालक आलोक वर्मा यांच्यानंतर विशेष संचालक अस्थाना हे दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर आहेत. अस्थाना हे भारतीय पोलीस सेवेच्या १९८४च्या तुकडीतील गुजरात कॅडरचे अधिकारी आहेत. मनी लॉड्रिंग आणि लाचखोरीसह अनेक खटले सुरू असलेला कर्नाटकमधील प्रमुख मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याकडून दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अस्थाना यांच्यावर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ‘सीबीआय’ने हे अधिकृतपणे जाहीर केले नसले, तरी त्या संस्थेतील व सरकारमधील माहितगार सूत्रांनी त्यास दुजोरा दिला.सू^त्रांनुसार काही दिवसांपूर्वी ‘सीबीआय’ने मनोज कुमार या मध्यस्थाला अटक केली. या मनोज कुमारने कुरेशीच्या वतीने अस्थाना यांना दोन कोेटी रुपयांची लाच दिल्याचा कबुलीजबाब दंडाधिकाºयांसमक्ष नोंदविल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.लाचखोरीच्या प्रकरणात अस्थाना यांचे नाव येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी बडोदा येथील संदेसरा या व्यापारी बंधूंना मदत केल्याच्या संदर्भात अस्थानांवर संशयाची सुई वळली होती. बँकांची ५,२०० कोटी रुपयांची कर्जे बुडवून हे संदोसरा बंधू परदेशात फरार झाले असून त्यांच्यावर ‘सीबीआय’ व ‘ईडी’या दोन्ही तपासी यंत्रणांनी गुन्हे नोंदविलेले आहेत.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग