शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; नित्यानंद आश्रमातील मुलांना अश्लील चित्रे दाखविल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 01:40 IST

नित्यानंद यांच्या आश्रमातील बालकांना अश्लील साहित्य दाखविल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अहमदाबाद : स्वयंघोषित स्वामी नित्यानंद यांच्याविरुद्ध दाखल अपहरणाच्या गुन्ह्यांची चौकशी करणाºया पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध पॉक्सो कायद्यातहत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा मार्च रोजी विशेष कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नित्यानंद यांच्या आश्रमातील बालकांना अश्लील साहित्य दाखविल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यात बालकल्याण समितीच्या सदस्यांचाही समावेश आहे. नित्यानंद यांचे शिष्य गिरीश तुरलापती यांच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर कोर्टाने याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. स्वामी नित्यानंद यांचा अहमदाबादलगतच्या हिरापूर येथे गुरुकुल-आश्रम आहे. विवेकानंदनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. तुरलापतीने याचिकेत पोलीस निरीक्षक आर. बी. राणा यांच्यासह पोलीस अधिकारी, बालकल्याण समितीच्या सदस्यांविरुद्ध असा आरोप केला की, त्यांनी आश्रमातील बालकांना उद्वेगजनक प्रश्न विचारले. चौकशी अधिकाºयांनी मानसिक छळ केला. तसेच मुलींसह मुलांना अश्लील चलचित्रे आणि छायाचित्रे दाखविली.हे आहेत आरोपी...आरोपींमध्ये पोलीस निरीक्षक राणा, उपाधीक्षक के. टी. कामरिया, रियाज सरवैया, एस. एच. शारदा, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिलीप मेर, बालकल्याण समितीचे अध्यक्ष भावेश पटेल आणि समितीच्या सदस्यांचा समावेश आहे. तक्रारदाराचा जबाब नोंदविण्यात आला असून, याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे, असे पोलीस उपधीक्षक (अहमदाबाद ग्रामीण) पी. डी. मन्वर यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस