अल्पवयीन मुलीला पळविणार्याविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: December 20, 2015 23:59 IST
जळगाव : शहरातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्या अज्ञाताविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीला पळविणार्याविरुद्ध गुन्हा
जळगाव : शहरातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्या अज्ञाताविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ डिसेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास एका तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या तरुणाचे नाव, गाव नव्हते केवळ त्याचा मोबाईल क्रमांक पोलिसांकडे फिर्यादमध्ये देण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर पाटील करीत आहेत.