शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

गेंदालाल मिल परिसरातील हाणामारीप्रकरणी चौघे अटकेत दोन्ही गटातील १० जणांविरुद्ध गुन्हा : रविवारी रात्री उफाळला होता वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 00:34 IST

जळगाव : गेंदालाल मिल परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एका गटातील चौघांना अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

जळगाव : गेंदालाल मिल परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एका गटातील चौघांना अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
याबाबत दोन्ही गटातील सदस्यांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. पहिल्या गटाकडून अशपाक खान बिस्मिल्ला खान (वय २८, रा.शिवाजीनगर) याने फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी जावेद लाला, जुनेद, एजाज, जुबेर, ज्ञानेश्वर वाघ, विजय वाघ, विशाल ठाकूर (सर्व रा.गेंदालाल मिल) यांनी १३ मार्चला रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिलसमोर फिर्यादी अशपाक खान याला शिवीगाळ, दमदाटी करत चाकूने मारून जखमी केले. तसेच त्याच्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण केली. अशपाकने रेल्वे पोलीस बलातील एस.बी. सिंग व कर्मचार्‍याविरुद्ध जळगाव न्यायालयात केलेली केस मागे घेऊन तडजोड करावी किंवा साक्षीला जाऊ नये, या कारणावरून हा प्रकार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून वरील संशयितांवर भादंवि कलम ३२६, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक जानकर करीत आहेत.
दुसर्‍या गटाच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा
दुसर्‍या गटाकडून जुनेद बशीर खान (वय १७, रा.गेंदालाल मिल) याने फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी अशपाक खान, इकबाल खान व सलीम गोल्या यांनी, फिर्यादी जुनेद खान याला खुन्नस देऊन का पाहतो, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास हेड कॉन्स्टेबल बडगुजर करीत आहेत.
चौघांना अटक
या प्रकरणात शहर पोलिसांनी जावेद लाला, जुबेर, विशाल ठाकूर, ज्ञानेश्वर वाघ या चौघांना अटक केली आहे.