शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या आरक्षित तिकिटांच्या रिफंडबाबत मध्य रेल्वेने केली महत्त्वपूर्ण घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 16:11 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेचे आगावू आरक्षण करणाऱ्यांची तिकिटे रद्द झाली आहेत. आता या रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा कसा मिळवायचा याची चिंता प्रवाशांना लागलेली आहे.

ठळक मुद्देरद्द झालेल्या तिकीटांचा परतावा मिळवण्यासाठी ३० जून नाही, तर प्रवासाच्या तारखेपासून पुढच्या सहा महिन्यांची मुदतपरतावा मिळवण्यासाठी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने घेतला हा निर्णय मध्य रेल्वेने लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटांच्या रकमेचा परतावा ३० जूनपर्यंत मिळवता येईल, असे ट्विट केले होते

मुंबई - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील रेल्वेसेवा विस्कळीत झालेली आहे. काही विशेष आणि नियमित गाड्या चालवण्यात येत असल्या तरी देशातील रेल्वे वाहतूक अद्याप रुळावर आलेली नाही. त्यामुळे रेल्वेचे आगावू आरक्षण करणाऱ्यांची तिकिटे रद्द झाली आहेत. आता या रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा कसा मिळवायचा याची चिंता प्रवाशांना लागलेली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे ट्रेन रद्द झाल्याने रद्द करण्यात आलेल्या आरक्षित तिकिटांच्या परताव्याबाबत मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. 

मध्य रेल्वेने रद्द झालेल्या तिकिटांच्या परताव्याबाबत या घोषणेतून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. आता रद्द झालेल्या तिकीटांचा परतावा मिळवण्यासाठी ३० जून नाही, तर प्रवासाच्या तारखेपासून पुढच्या सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा मिळवण्यासाठी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. 

यापूर्वी मध्य रेल्वेने लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटांच्या रकमेचा परतावा ३० जूनपर्यंत मिळवता येईल, असे ट्विट केले होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात लाखो तिकीट रद्द झालेली असल्याने परतावा मिळवण्यासाठी तिकी खिडक्यांवर गर्दी होत होती. 

तिकीट खिडक्यांवर होत असलेल्या गर्दीमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत होते. तसेच गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नव्हते. त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या तिकीटांचा परतावा प्रवासाच्या तारखेपासून पुढच्या सहा महिन्यांमध्ये मिळवता येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या