शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Corona Vaccination: १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 07:58 IST

Covid Vaccination Open For Everyone Above 18 From 1 May What New How To Register: कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालल्यानं केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णांचा झपाट्यानं वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदा एका दिवसात कोरोनाचे १ लाख नवे रुग्ण आढळून आले. त्यानंतर १० दिवसांमध्ये हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. काल देशात जवळपास पावणे तीन लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्यानं केंद्र सरकारनं काल महत्त्वाचा निर्णय घेतला. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे. (Covid Vaccination Open For Everyone Above 18 From 1 May What New How To Register)लवकरच नवा नियम; किराणा दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंत१ मेपर्यंत देशातील बाजारपेठेत कोरोना लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. या लसीची किंमत काय असणार याबद्दलचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. यापुढे राज्य सरकारं थेट कंपन्यांकडून कोरोना लसींची खरेदी करू शकतात. याआधी लस पुरवठ्यावरून केंद्र विरुद्ध राज्य असा 'सामना' पाहायला मिळाला होता. केंद्राकडून लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात नसल्याची तक्रार काही राज्यांकडून केली जात होती. त्यात महाराष्ट्राचाही समावेश होता.मायक्रो कंटेन्मेंट झोनमधील नियम मोडल्यास दहा हजारांचा दंड१८ वर्षांवरील सर्वांना लस; जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेता येईल. यासाठी आधी नोंदणी करावी लागेल. कोविन ऍप किंवा आरोग्य सेतु ऍपवर तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करू शकता. त्यासाठी ऍपवर आवश्यक माहिती भरून तुमचं ओळखपत्र अपलोड करावं लागेल. तुम्ही लसीकरण केंद्रावर जाऊनदेखील नोंदणी करू शकता. रुग्णालयं, लसीकरण केंद्रांवर गेल्यावरही नोंदणी करता येऊ शकते. पण तिथे गर्दी असण्याची शक्यता असल्यानं ऑनलाईन नोंदणी हा चांगला पर्याय आहे. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्टसारख्या वैध ओळखपत्रांच्या आधारे तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करू शकता. मोदी सरकारचा मोठा निर्णयकेंद्र सरकारनं लसीकरण अभियानाला वेग देण्यासाठी राज्यं, खासगी रुग्णालयं आणि औद्योगिक संस्थांना थेट लस कंपन्यांकडून साठा खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. पुढील महिन्यापासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याच्या अंतर्गत लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांच्या केंद्रीय औषध प्रयोगशाळांमधून प्रत्येक महिन्याला तयार होणाऱ्या लसींपैकी ५० टक्के साठा केंद्र सरकारला करतील आणि उर्वरित ५० टक्के साठा राज्य सरकारांसह खुल्या बाजारपेठांमध्ये विकण्याचं स्वातंत्र्य त्यांना असेल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस