शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Corona Vaccination : तीन महिन्यांत सर्व दिल्लीकरांचे लसीकरण होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 2:36 PM

Corona Vaccination : राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे.

ठळक मुद्देदिल्लीत कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर केली जात आहे.

नवी दिल्ली :  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

दिल्लीत कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर केली जात आहे. दरम्यान, 'आम्ही दररोज सव्वा लाख लसीचे डोस नागरिकांना देत आहेत. तसेच, आम्ही लवकरच 3 लाखांहून अधिक लोकांना लस देण्यास सुरूवात करणार आहे', असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. याशिवाय, येत्या तीन महिन्यांत सर्व दिल्लीकरांना लस देण्याचे आमचे लक्ष्य आहे. परंतु लसींचा पुरवठा कमी असल्याची समस्या आहे, असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. (covid-19 vaccination announcement of cm kejriwal, all delhiites are to be vaccinated in 3 months)

दिल्ली सरकारच्या ज्या शाळांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे, तेथील लोक आनंदी आहेत. दिल्लीत आता काही दिवसांपूर्वता लसींचा साठा शिल्लक आहे. लसींबाबत समस्या देशव्यापी आहे, संपूर्ण देशात लसींची कमतरता आहे. काही राज्यात लसीकरणाचे कामदेखील सुरू झाले नाही, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. याशिवाय, सध्या दोन कंपन्या लसींचे उत्पादन करत आहे. लस उत्पादन युद्धपातळीवर केले पाहिजे. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाला लस लागू करण्याची राष्ट्रीय योजना तयार केली पाहिजे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

'माझी एक सूचना आहे. फक्त दोन कंपन्यांनी लस बनवू नये, तर इतरही कंपन्यांनी लस तयार करावी. केंद्र सरकारने ज्या कंपन्या सुरक्षित पद्धतीने लस बनवू शकतात त्यांना फॉर्म्युला द्यावा. हे सुनिश्चित केले पाहिजे की सक्षम असलेल्या प्लांटमध्ये लस तयार केली पाहिजे', असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

(Corona Vaccine: खासगी रुग्णालयांमध्ये सर्वात महाग मिळतेय कोरोनाची लस, जाणून घ्या किंमत...)

याचबरोबर, पहिल्या कोरोना लाटेत पीपीई किटांची कमतरता होती. पण आता आम्ही बनवत आहोत, आपल्याकडे सर्वात मोठ्या फार्मा कंपन्या आहेत, सर्वोत्तम वैज्ञानिक आहेत. आपण लस बनवू शकतो. ज्या कंपन्यांनी मूळ फॉर्म्युला बनविला आहे त्यांना रॉयल्टी म्हणून काही भाग देता येईल, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

(धक्कादायक! कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवघ्या काही तासांत डॉक्टरचा मृत्यू!)

दिल्लीत कोरोनाची स्थिती गंभीरराजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन एक आठवडा वाढविण्यात आले आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या काही दिवसांत १३ हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर २७३ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत सध्या जवळपास ८६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या