शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

COVID-19 Third Wave: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुढील १०० दिवस का आहेत महत्वाचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 1:04 PM

COVID-19 Third Wave: देशात अनेक राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत.

COVID-19 Third Wave: देशात अनेक राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार नागरिकांनी अतिशय सतर्क राहण्याची गरज आहे. जगात अनेक देशांमध्ये तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यानं धडक दिल्याचं सांगितलं जात आहे. जगात कोरोना रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यात भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि जगातील एकंदर ट्रेंड पाहता पुढील १०० दिवस देशासाठी अतिशय महत्वाचं मानले जात आहेत. (covid 19 third wave and importance of next 100 days to stop it in india)

जगातील कोरोना रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढदेशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी जगात अनेक देशांमध्ये आता कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ही धोक्याची घंटा ठरू शकते. जगभरातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता या आठवड्यात ३३.७६ लाख कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या आठवड्यात हीच संख्या २९.२२ लाख इतकी होती. कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहिला तर लक्षात येतं की रुग्णसंख्येत १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनाची ही वाढती आकडेवारी येणाऱ्या संकटाची चाहूल तर ठरताना दिसत आहे. स्पेनमध्ये सध्या कोरोनानं भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. स्पेनमध्ये एका आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत तब्बल ६४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तर नेदरलँडमध्ये जवळपास ३०० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. 

भारतात कोरोना रुग्णसंख्येतील घट धीम्या गतीनंदक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलँडमध्ये कोरोना रुग्णसंख्येच अचानक वाढ होताना दिसून येत आहे. भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी आधीच्या तुलनेत रुग्णघटीचा वेग अतिशय कमी झाला आहे. त्यामुळे भारतावरही तिसऱ्या लाटेच्या संकटाची टांगती तलवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा नागरिकांना तिसऱ्या लाटेसंदर्भात सतर्क केलेलं आहे. 

८ टक्क्यांहून कमी लोकांचं लसीकरणदेशात कोरोना लसीकरण मोहिम सुरू होऊन काहीच महिने उलटले आहेत. सरकारच्या दाव्यानुसार देशात ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे. गेल्या ६ महिन्यात देशातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ ८ टक्के लोकांचंच लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंतचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य कसं पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत ४० कोटी नागरिकांचच लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग पाहता तिसऱ्या लाटेचं संकट अधिक गडद होत जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस