शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : रेमडेसिविर, ऑक्सिजनशिवाय ८५ टक्के रुग्ण बरे होतायेत - डॉ. रणदीप गुलेरिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 08:54 IST

CoronaVirus : लोकांनी ऑक्सिजन 'सेफ्टी कवच' म्हणून वापरू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. तसेच, कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडूनही काही उपाय-योजना करण्यात येत आहेत. दरम्यान, देशातील वरिष्ठ डॉक्टरांनी कोरोना परिस्थितीबाबत भाष्य केले आहे. यावेळी ऑक्सिजन औषधासारखा असून थांबून-थांबून घेणे फायद्याचे नाही. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कोणत्या प्रकारे उपयोगी आहे किंवा नाही, हे दाखविणारा कोणताही डेटा उपलब्ध नाही, त्यामुळे ऑक्सिजनचा सल्ला निरुपयोगी असल्याचे मत या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तसेच, कोरोनाचे (कोविड -१९) ८५ टक्के रुग्ण रेमेडीसवीर इत्यादी विशिष्ट उपचारांशिवाय बरे होत आहेत, असे एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया म्हणाले. (Covid 19 Patients Will Not Benefit From Stopping And Taking Oxygen, Aiims Delhi Director Dr Randeep Guleria)

५-७ दिवसांच्या उपचारानंतर रुग्ण बरे होतीलडॉक्टर रणदीप गुलेरिया म्हणाले, "बहुतेक लोकांना सर्दी, घसा खवखवणे इ. सारखी सामान्य लक्षणे दिसू लागतील आणि पाच ते सात दिवसांत ते उपचारांद्वारे या लक्षणांपासून बरे होतील. केवळ १५ टक्के रुग्णांना आजाराच्या मध्यम टप्प्यात सामोरे जावे लागते. ''

९४ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन सेच्युरेशन रुग्णांना देखरेखीची गरजडॉक्टर रणदीप गुलेरिया म्हणाले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार, निरोगी लोक, ज्यांचे ऑक्सिजन सेच्युरेशन ९३-९४ टक्के आहे, त्यांना आपले सेचुरेशनला ९८-९९ टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी उच्च प्रवाह ऑक्सिजन घेण्याची गरज नाही. ९४ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन रेच्युरेशन असलेल्या लोकांना देखरेखीची आवश्यकता आहे. 

याचबरोबर, ते म्हणाले, "ऑक्सिजन एक उपचार आहे. हा एक औषधाप्रमाणे आहे. थांबून-थांबून याचा वापर करणे काही उपयोगाचे नाही. असा कोणताही डेटा नाही, की जो दर्शवतो कोरोना रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारे उपयुक्त ठरणार आहे की नाही. म्हणून हा निरुपयोगी सल्ला आहे.''

योग्य पद्धतीने वापर केल्यास पुरेसा आहे ऑक्सिजनमेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान म्हणाले की, जर आपण ऑक्सिजनचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला तर देशात ऑक्सिजनचे प्रमाण पुरेसे आहे. लोकांनी ऑक्सिजन 'सेफ्टी कवच' म्हणून वापरू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, ऑक्सिजनच्या या अपव्ययांमुळे ज्यांना याची गरज आहे, ते यापासून वंचित राहतील, असेही डॉ. नरेश त्रेहान यांनी म्हटले आहे.

(CoronaVirus: कोरोनाचे संक्रमण टाळायचे असेल तर घरीदेखील मास्क वापरा! वाचा डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणतात...)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल