शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड 19 म्हणजे किरकोळ सर्दीचा आजार, 100 वर्षीय आजीची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 16:52 IST

कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यात एका 100 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्देकर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यात एका 100 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे.

बंगळुरू - देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एकाच दिवसात तब्बल 49,310 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबद्दल नागरिकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. मात्र, दुसरीकडे उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण 63.45 टक्के आहे. कर्नाटकातील एका 100 वर्षीय आजीने कोरोनावर मात केली असून कोरोना किरकोळ आजार असल्याचं म्हटलंय.  

कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यात एका 100 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर मी रुग्णलयात दाखल होते. तेथे डॉक्टरांनी माझी चांगली देखभाल घेतली, तसेच मला दररोज सफरचंद, औषधं आणि इंजेक्शनही देण्यात आले. त्यामुळे, आता माझी तब्येत ठणठणीत असल्याचं या आजींनी म्हटलं. तसेच,  कोरोना हा किरकोळ सर्दीचा आजार असल्याचंही हल्लाम्मा यांनी म्हटलंय. या आजीबाईंच्या मुलाला, सुनेला आणि नातवालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी घरीच उपचार घेऊन कोरोनावर मात दिली. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा मुलगा बँकेत नोकरी करत असून 3 जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर, 16 जुलै रोजी हल्लम्मा यांना कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. मात्र, कोरोनावर मात करत, 22 जुलै रोजी आजीची कोविड टेस्ट निगेटीव्ह आली आहे.  

दरम्यान, देशातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 12 लाख 87 हजार 945 पर्यंत पोहोचली आहे. त्यामध्ये, 8 लाख 17 हजार 208 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवाडीनुसार देशात आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 30,601 एवढी झाली आहे. सद्यस्थितीत देशात 4 लाख 40 हजार 135 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, आत्तापर्यंत 63.45 टक्के रुग्ण बरो होऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर