शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकपाल नेमण्यात दिरंगाई होण्याने कोर्ट नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:57 IST

लोकपाल कायदा लागू होऊन दोन वर्षे झाली तरी लोकपालांची प्रत्यक्ष नेमणूक करण्यात होत असलेल्या दिरंर्गाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नवी दिल्ली : लोकपाल कायदा लागू होऊन दोन वर्षे झाली तरी लोकपालांची प्रत्यक्ष नेमणूक करण्यात होत असलेल्या दिरंर्गाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकपालांच्या संभाव्य नावांचे पॅनेल तयार करण्यासाठी नेमायची शोध समिती नेमून तिचेकाम केव्हा पूर्ण होणार याचा नक्की कालावधी सरकारने चार आठवड्यांत सांगावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.‘कॉमन कॉज’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अवमान याचिकेवरून हा विषय न्या. तरुण गोगोई, न्या. आर. भानुमती व न्या. नविन सिन्हा यांच्या खंडपीठापुढे आहे. गेल्या १७ जुलै रोजी सुनावणी झाली तेव्हा सरकारने असे सांगितले होते की,शोध समिती नेमण्यासाठीलोकपाल निवड समितीची बैठक १९ तारखेला व्हायची आहे. त्यामुळे कोणताही आदेश न देता न्यायालयाने त्या बैठकीत शोध समितीनेमली जाईल, अशी आशा व्यक्त केली होती.अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी १९ तारखेच्या बैठकीत काय झाले याचे कार्मिक विभागाचे सचिव सी. चंद्रमौळी यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात असे म्हटले होते की, ठरल्याप्रमाणे निवड समितीची बैठक झाली.शोध समितीसाठी प्रत्येक सदस्याने आपापली नावे सुचवावी व नंतर अध्यक्ष व अ्न्य सदस्यांच्या सोईनुसार पुढील बैठक घेऊन शोध समितीवर निर्णय घ्यावा. सरकारचे हे प्रतिज्ञापत्र अजिबात समाधानकारक नाही, असे न्यायालयाने सांगितले.याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. प्रशांत भूषण म्हणाले की, सरकार चालढकल करते आहे हे उघड आहे. त्यामुळे आता दोनच पर्याय आहेत. एक तर संबंधितांवर अवमानाची कारवाई करावी. किंवान्यायालयाने सूत्रे हाती घेऊन आदी सोध समितीची व नंतरलोकपालांची निवड व नेमणूकही न्यायालयानेच करावी.> सरकारला आम्हीच शिकवावे, असे वाटत नाहीनव्या प्रतिज्ञापत्रात नेमका कोणता तपशील असावा, याचाही न्यायालयाने आदेशात उल्लेख करावा, असे वेणुगोपाळ यांनी सूचविले. मात्र ते अमान्य करताना खंडपीठाने सांगितले की, तुम्ही काय करणे अपेक्षित आहे, हे आम्ही तुम्हाला सांगितले आहे. त्यानुसार प्रतिज्ञापत्र कसे करावे हेदेखिल सरकारला आम्हीच शिकवावे, असे आम्हालावाटत नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार