शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

बीआरएस नेत्या के कविता यांना धक्का! न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 6:05 PM

अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली असून आता त्यांना कोर्टाने झटका दिला आहे.

भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने १५ एप्रिल २०२४ पर्यंत सीबीआयच्या कोठडीत आहेत. न्यायालयाने शुक्रवारी के. कविता यांना  पाच दिवसांची कोठडी देण्याची विनंती करणाऱ्या सीबीआयच्या याचिकेवरील आदेश सायंकाळपर्यंत राखून ठेवण्यात आला होता.

'लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची? 'शरद पवारांच्या 'त्या' विधानावर अंजली दमानियांचा सवाल

दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सीबीआयने कविता यांना अटक केली आहे. सीबीआयने कविता यांना गुन्हेगारी कट आणि खात्यांमध्ये फेरफार आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या काही कलमांखाली ताब्यात घेतले होते. सीबीआयने कोर्टाकडे बीआरएस नेत्याच्या ५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

न्यायालयात सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की, आम आदमी पार्टीला १०० कोटी रुपयांची लाच देण्यात के कविता यांनी मोठी भूमिका बजावली. त्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आहेत. एका मोठ्या उद्योगपतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्पादन शुल्क धोरणाद्वारे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणाशी संबंधित अनेक आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हॉटेल ताजमध्ये ही बैठक झाल्याचे वकिलांनी सांगितले.

सीबीआयने सांगितले की, के कविता यांनी हैदराबादमध्ये व्यावसायिकाची भेट घेतली होती. विजय नायर यांच्या त्या संपर्कात होत्या. बीआरएस नेत्याने व्यावसायिकाला १०० कोटी रुपयांच्या आगाऊ रकमेची व्यवस्था करण्यास सांगितले होते. या पैशाची व्यवस्था करण्यात कविता यांचा मोठा वाटा होता. गोवा निवडणुकीसाठी हवालाद्वारे पैसे गोळा करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. 

दिल्लीतील मद्य धोरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी के कविता यांनी शरतचंद्र रेड्डी यांना पुढे केले होते, असे तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले. अभिषेक बोईनपल्ली यांनी विजय नायर यांना १०० कोटी रुपये दिल्याचे सांगितले होते, याला सरकारी साक्षीदार दिनेश अरोरा यांनी पुष्टी दिली आहे. मद्य धोरणात आतापर्यंत दाखल झालेल्या आरोपपत्रातील मनीष सिसोदिया, विजय नायर आणि अन्य आरोपींच्या भूमिकेबाबतचे तथ्य सीबीआयने न्यायालयासमोर मांडले, त्या आधारे के कविता यांच्या कोठडीची मागणी करण्यात आली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालयBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती