शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 13:29 IST

वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली - वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. वंदे मातरमला आतापर्यंत जन-गन-मन सारखा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळे  न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली होती.  भाजपाशी संबंधित असलेल्या अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. सर्व शाळांमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत म्हणून गायले गेले पाहिजे. तसेच त्यासाठी एक राष्ट्रीय धोरण बनवले गेले पाहिजे, अशी मागणी उपाध्याय यांना या याचिकेमधून केली होती.  दरम्यान, वंदे मातरमला अनिवार्य बनवण्याबाबत काही धार्मिक संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे. वंदे मातरममध्ये देशाला माता मानून त्याची स्तुती करण्यात आली आहे. आपला धर्म त्याला मान्यता देत नाही. त्यामुळेच आदेशाद्वारे हा निर्णय थोपवता येणार नाही, असे या संघटनांचे म्हणणे होते.  याआधी 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, संविधानातील कलम 51(अ) म्हणजेच मुलभूत कर्तव्यांमध्ये केवळ जन-गण-मन आणि राष्ट्रीय ध्वजाचाच उल्लेख आहे. तामुळे वंदे मातरमला अनिवार्य करता येणार नाही. आता दिल्ली हायकोर्टानेही अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना अशीच टिप्पणी केली आहे.  

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमHigh Courtउच्च न्यायालयNew Delhiनवी दिल्ली