रोहतास : बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील न्यायालयाने चक्क हनुमानालाच नोटीस पाठवून दिली आहे. एवढेच काय; पण न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. न्यायालयाने दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, आपल्या मंदिरामुळे येथून येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडथळा होत आहे. त्यामुळे हे मंदिर येथून हटवावे. विशेष म्हणजे ही नोटीस हनुमानाच्या मूर्तीच्या गळ्यात टाकण्यात आली. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत एक याचिका दाखल केली होती. पंचमुखी हनुमान मंदिराविरुद्ध असलेल्या या याचिकेत या मंदिरामुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने ही नोटीस जारी केली आहे. (प्रतिनिधी)
हनुमानाला न्यायालयाची नोटीस
By admin | Updated: February 17, 2016 03:08 IST