शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Court News: ‘अहवाल २२ वर्षे का दाबून ठेवला?’सीबीआय संचालकांना न्यायालयाने दिली तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 07:49 IST

CBI News: युरिया घाेटाळ्याप्रकरणी २२ वर्षांनी तपास बंद करण्याबाबत अहवाल सादर केल्यावरून विशेष सत्र न्यायालयाने सीबीआयला फटकारले असून, हा अहवालही फेटाळला आहे. एवढी वर्षे अहवाल का दाबून ठेवला, असा सवाल न्यायालयाने केला आहे.

नवी दिल्ली : युरिया घाेटाळ्याप्रकरणी २२ वर्षांनी तपास बंद करण्याबाबत अहवाल सादर केल्यावरून विशेष सत्र न्यायालयाने सीबीआयला फटकारले असून, हा अहवालही फेटाळला आहे. एवढी वर्षे अहवाल का दाबून ठेवला, असा सवाल न्यायालयाने केला आहे. असा प्रकार पुन्हा व्हायला नकाे, अशी तंबीही न्यायालयाने ‘सीबीआय’च्या संचालकांना दिली आहे.

सीबीआयने १९९५च्या युरिया घाेटाळ्याशी संबंधित प्रकरणात २०२१ मध्ये तपास बंदी अहवाल सादर केला. तब्बल २२ वर्षांनी अहवाल सादर केल्याने विशेष सत्र न्या. सुरिंद राठी यांनी सीबीआयला खडे बाेल सुनावले. ते म्हणाले, की सीबीआयने यापूर्वी १९९९ मध्ये अखेरचा तपास केला हाेता. सीबीआय एवढे वर्ष अहवालावर बसून हाेते. विद्यमान तपास अधिकारी व संबंधित पाेलीस अधीक्षकांनाही विलंबाबाबत चर्चा करावी असे वाटले नाही. उलट हे हेतुपुरस्सर केल्याचे स्पष्ट असून, ते स्वीकारार्ह नाही.

 ‘सीबीआय’च्या संचालकांनाही याबाबत चिंता असायला हवी. या प्रकरणात त्यांनी लक्ष घालून कारवाई करावी, असेही न्या. राठी यांनी स्पष्ट केले.  सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांनी दाेन दिवसांपूर्वीच ‘सीबीआय’ने विश्वासार्हता गमाविल्याची टीका केली हाेती. त्यानंतर सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे प्रकरण समाेर आले आहे.‘हे समजण्यापलीकडचे’- २२ वर्षे यात काेणताही तपास केला नाही. एवढी वर्षे अहवाल का दाबून ठेवला यामागचा हेतू समजण्याच्या पलीकडे आहे, असे न्या. राठी यांनी नमूद केले.- नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडला १३३ कोटींनी फसविल्याचे हे प्रकरण हाेते. तपास बंदी अहवाल सादर केला, त्या प्रकरणात १९९७ मध्ये गुन्हे दाखल झाले. युरिया पुरवठ्याच्या या प्रकरणात काेणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही, असे अहवालामध्ये म्हटले हाेते. मात्र हा निष्कर्ष विश्वसनीय नसल्याचे न्या. राठी म्हणाले. 

टॅग्स :Courtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग