शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अटकपूर्व जामीन हवाय? मग केरळमधील पूरग्रस्तांना मदत करा; हायकोर्टाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 12:34 IST

तीन आरोपींना केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आदेश

रांची: झारखंड उच्च न्यायालयानं तीन आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यासाठी केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याची अट घातली आहे. अटकपूर्व जामीन हवा असल्यास, केरळ मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये ठराविक रक्कम जमा करा, असे आदेश झारखंड उच्च न्यायालयानं तीन आरोपींना दिले आहेत. महापुरामुळे प्रचंड वाताहत झालेल्या केरळला मदतीची गरज असल्यानं न्यायमूर्ती ए. बी. सिंह यांनी तीन आरोपींना पूरग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना केल्या. न्यायमूर्ती सिंह यांनी आरोपी उत्पल रायला अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र त्याआधी त्याला केरळ मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये 7 हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिले. उत्पल रायवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय ज्ञानेश्वर मंडल आणि संभू मंडल यांनाही अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. त्यांना जामीन देण्याआधी केरळमधील पूरग्रस्तांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत करण्याच्या सूचना न्यायालयानं दिल्या.आरोपींनी पूरग्रस्तांना मदत केल्याचा पुरावा न्यायालयात सादर करण्याचे आदेशदेखील न्यायमूर्ती सिंह यांनी दिले. झारखंड उच्च न्यायालयाच्या वकील संघटनेचे हेमंत कुमार सिकरवार यांनी न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलं आहे. केरळमधील भीषण स्थिती लक्षात घेऊन मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील उच्च न्यायालयांनीदेखील अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या, याची आठवणदेखील त्यांनी करुन दिली आहे.  

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरHigh Courtउच्च न्यायालय