शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित तिकीट असतानाही प्रवाशांना बसायला दिली नाही जागा, ग्राहक न्यायालयाचा रेल्वेला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 18:00 IST

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एका न्यायालयानं भारतीय रेल्वेला दंड ठोठावला आहे. रेल्वे आरक्षण असतानाही प्रवाशाला बसायला सीट न दिल्यानं त्या प्रवाशानं रेल्वेविरोधात न्यायालयात दाद मागितली.

बंगळुरू- कर्नाटकातल्या म्हैसूरमधील एका प्रकरणात ग्राहक न्यायालयानं भारतीय रेल्वेला चांगलाच झटका दिला आहे. रेल्वे आरक्षण असतानाही जयपूर-म्हैसूर असा प्रवास करणा-या तीन प्रवाशांना बसायला सीट न दिल्यानं ग्राहक न्यायालयानं त्या प्रवाशांना 37 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.टीटीई आणि आरपीएफकडे तक्रार केल्यानंतरही रेल्वे प्रशासनानं त्या प्रवाशांची दखल न घेतल्यानं अखेर त्या प्रवाशांना न्यायासाठी ग्राहक न्यायालयात जावं लागलं. ग्राहक न्यायालयानं त्यावर निर्णय देताना रेल्वे प्रशासनाला 37 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. जयपूर-म्हैसूर सुपरफास्ट ट्रेनमधून प्रवास करणा-या तीन जागांचं आरक्षण केलेल्या कुटुंबीयांच्या जागेवर दुस-याच प्रवाशांनी कब्जा केला होता. त्यामुळे तिकीट असूनही त्या प्रवाशांना जवळपास 33 तास त्रासदायक प्रवास करावा लागला. एकाच कुटुंबातील तिन्ही प्रवाशांनी या प्रवासासाठी प्रत्येकी 740 रुपयांचं तिकीट काढलं होतं. 

प्रवाशांनी या प्रकारात न्याय मिळावा, यासाठी ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयानं या प्रकारावर टीका करत ड्युटीवर कार्यरत असलेला टीटीई आणि आरपीएफ कर्मचा-यांना खडे बोल सुनावले. म्हैसूरमधील सिद्धार्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जयपूर-म्हैसूर सुपरफास्ट ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी 25 मे 2017 रोजी तिकीट आरक्षित केले. परंतु आरक्षित तिकीट असतानाही त्यांना त्यांच्या जागेवर अनारक्षित प्रवाशांनी बसू दिले नाही.उज्जैन स्टेशनवर ट्रेनमध्ये चढल्यानंतर एस 5 या बोगीतील त्यांच्या आरक्षित तिकिटांवर दुस-याच लोकांना कब्जा केला होता. एस 5 हा पूर्ण डबा अनारक्षित लोकांनी भरलेला होता. या प्रवाशांनी जवळपास 33 तासांनंतर स्वतःची जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही अयशस्वी ठरला. इतकेच नव्हे तर त्यांनी टीटीई आणि आरपीएफकडे तक्रारही दाखल केली. परंतु टीटीई आणि आरपीएफनं कोणतीही कारवाई केली नाही. सिद्धार्थ यांनी भारतीय रेल्वेकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केला. मात्र त्यांची रेल्वे प्रशासनानं दखल घेतली नाही. अखेर त्यांनीही याबाबत न्यायालयाकडे दाद मागितली. त्यावेळी न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला प्रवाशांना दंड देण्यास सांगितले. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीIndian Railwayभारतीय रेल्वे