शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

...नक्कीच डंका वाजला!

By admin | Updated: August 19, 2015 01:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने दुबईत निश्चितच एक भारावलेपणा होता; आणि ते भारावलेपण हे केवळ इथल्या भारतीयांतच नव्हते, तर यूएईचे सरकार

शिल्पा मोहिते-कुलकर्णीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने दुबईत निश्चितच एक भारावलेपणा होता; आणि ते भारावलेपण हे केवळ इथल्या भारतीयांतच नव्हते, तर यूएईचे सरकार आणि जनतेतही त्याबद्दल विलक्षण कुतूहल होते.दुबई क्रिकेट स्टेडियमवर मोदी यांच्या भाषणास ४० हजार भारतीयांसोबतच अरब व काही अमेरिकी, युरोपियन लोकांची उपस्थिती ही उल्लेखनीय गोष्ट होती. मोदी यांचे भाषण जरी हिंदीत असले तरी अनेक अरबांनी त्यातील ‘पंचेस’ आणि महत्त्वाचे मुद्दे ‘गोऱ्या’ मंडळींच्या कानात अनुवादित करून सांगितल्याची दृश्ये वेळोवेळी स्क्रीनवर दिसत होती. भारतीय पंतप्रधानांनी हिंदीतून केलेल्या भाषणाचा अरबांनी ‘गोऱ्यां’च्या कानात इंग्रजीतून केलेला हा अनुवाद आणि ते दृश्य यातूनच भारत व यूएई या दोघांना एकमेकांबद्दल असलेले महत्त्व अधोरेखित होते व हीच जगात भारत आणि भारतीयांचे वाढणारे महत्त्व अधोरेखित करणारी बाब आहे.गेल्या रविवारी अबु धाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले आणि विमानाच्या बाहेर त्यांना एक अभूतपूर्व दृश्य अनुभवायला मिळाले. ते म्हणजे, अबु धाबीचे क्राऊन प्रिन्स आणि त्यांचे चारही भाऊ तसेच यूएई आर्म्ड फोर्सचे डेप्युटी सुप्रीम कमांडर हिज हायनेस शेख मोहम्मद बिन झयाद नाह्यान हे मोदी यांच्या स्वागतासाठी जातीने उपस्थित होते. एवढेच नव्हे, तर मोदी यांच्या स्वागतासाठी २१ तोफांची सलामीदेखील देण्यात आली. सरकारी आणि राजशिष्टाचार विभागाच्या लवाजम्यापेक्षाही पाच राजपुत्रांची एकावेळी एका नेत्याच्या स्वागतासाठी असलेली उपस्थिती आणि तोफांची सलामी हीच अत्यंत बोलकी म्हणावी लागेल. यामध्ये आदरातिथ्य हा भाग तर होताच, पण भारत आणि भारताचे पंतप्रधान हे आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, याचा संदेश मोदी यांच्या भेटीच्या पहिल्या क्षणापासून देण्यात आला.भारतात लोकसभा निवडणुकीनंतर झालेले सत्तांतर, मोदी यांनी अमेरिका, चीन, आॅस्ट्रेलिया या आणि अशा काही प्रमुख देशांचे केलेले दौरे आणि या सर्व दौऱ्यांत त्यांनी आवर्जून अनिवासी भारतीयांशी साधलेला संवाद आणि २५ लाखांपेक्षा जास्त गेल्या रविवारी अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे आगमन झाले आणि विमानाच्या बाहेर त्यांना एक अभूतपूर्व दृष्य अनुभवायला मिळाले. ते म्हणजे, अबुधाबीचे क्राऊन पिन्स आणि त्यांचे चारही भाऊ तसेच युएई आर्म्ड फोर्सचे डेप्युटी सुप्रीम कमांडर हिस हायनेस शेख मोहम्मद बिन झयाद नाह्यान हे मोदी यांच्या स्वागतासाठी जातीने उपस्थित होते. एवढेच नव्हे तर तर मोदी यांच्या स्वागतासाठी २१ तोफांची सलामी देखील देण्यात आली. सरकारी आणि राजशिष्टाचार विभागाच्या लवाजम्यापेक्षाही पाच राजपुत्रांची एकावेळी एका नेत्याच्या स्वागतासाठी असलेली उपस्थिती आणि तोफांची सलामी हीच अत्यंत बोलकी म्हणावी लागेल. यामध्ये आदरातिथ्य हा भाग तर होताच, पण भारत आणि भारताचे पंतप्रधान हे आमच्यासाठी किती महत्वाचे आहेत, याचा संदेश मोदी यांच्या भेटीच्या पहिल्या क्षणापासून देण्यात आला.भारतात लोकसभा निवडणुकीनंतर झालेले सत्तांतर, मोदी यांनी अमेरिका, चीन, आॅस्ट्रेलिया या आणि अशा काही प्रमुख देशांचे केलेले दौरे आणि या सर्व दौऱ्यात त्यांनी आवर्जून अनिवासी भारतीयांशी साधलेला संवाद आणि २५ लाखांपेक्षा जास्त भारतीयांचा गेली काही दशके वास्तव्य असलेल्या युएईत ३४ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांनी दौरा करणे यामुळे या दौऱ्याबद्दल इथे कमालीची उत्सुकता होती. खरंतर नरेन्द्र मोदी हे युएईच्या दौऱ्यावर येणार असल्याच्या बातम्या इथल्या वर्तमानपत्रांतून सुमारे १५ दिवसांपासून प्रसिद्ध झाल्या. या अनुषंगाने भारत आणि युएई दरम्यान असलेले संबंध इथपासून ते युएईच्या विशेषत: दुबईच्या विकासातील भारतीयांचे योगदान तसेच, मोदी यांच्या या दौऱ्याचे महत्व आणि त्याचे कंगोरे असे विस्तृत लिखाण माध्यमांतून प्रसिद्ध झाले. मोदी यांच्या दौऱ्याबद्दल निमिष दोषी या गुजरातमधून इथे वास्तव्यास आलेल्या मित्राची प्रतिक्रिया बोलकी होती, तो म्हणाला मोदी हे त्यांच्या ‘टायमिंग’साठी देखील ओळखले जातात. स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ आणि १७ आॅगस्टला त्यांनी केलेला दौरा हा त्याचाच नमुना म्हणावा लागेल. मोदी यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने वातावरणात निश्चितच एक भारावलेपणा होता आणि ते भारावलेपण हे केवळ इथल्या भारतीयांतच नव्हते तर युएईचे सरकार आणि इथले स्थानिकअरब नागरिक यांना देखील या दौऱ्याबद्दल एक विलक्षण कुतुहल होते. या कुतुहलामागे काही कारणेही आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे, या देशाच्या आणि विशेषत: दुबईसारख्या शहराच्या विकासात भारतीयांचे योगदान हे उल्लेखनीय आहे. इथल्या १०० श्रीमतांच्या यादीत देखील अनेक भारतीयांची नावे आहेत त्यामुळे इथल्या अर्थकारणावर असलेला त्यांचा प्रभाव हे त्यांचे इथल्या व्यवस्थेतील महत्व अधोरेखित करतो. तसेच, भारत आणि युएई यांच्यातील व्यापार उद्दीमाचे दुतर्फा संबंध अनेक दशकांचे आहेत. सुमारे ६० अब्ज अमेरिकन डॉलर इतक्या मोठ्या प्रमाणावर होणार असा हा ट्रेड आहे. या संदर्भात येथील एक अर्थतज्ज्ञ डॉ. राम मिसाळ यांच्यामते, भारतीय अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विकास होत आहे. आगामी दोन ते तीन वर्षांत जगातील पहिल्या पाचातील अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचा दबदबा जगात असेल. अशावेळी भारतासारखा भक्कम देश पाठिशी असावा, असा सुज्ञ राजकीय विचार इथल्या राज्यकर्त्यांनी केल्याचे दिसते. केवळ भारतीय अर्थव्यवस्थेतील भक्कमपणाच नव्हे तर तर भारताशी सलोख्याचे संबंध जोडणे याला वेगळे, सामाजिक आणि सांस्कृतिक असे कंगोरे देखील आहेत, असे मत इथे गेल्या तीन दशकांपासून वास्तव्यास असलेल्या रमेश वालावलकर यांनी व्यक्त केले. त्यांच्यामते, पश्चिम आशियात चीन आणि भारत आणि काही प्रमाणात पाकिस्तान या देशांचा प्रमुख देश म्हणून उल्लेख करावा लागेल. पण, चीन आणि युएई या संबंधांचा विचार केला तर भाषा आणि वृत्ती, तसेच व्यापार उद्दीमातील पूर्वइतिहास यामुळे युएई आणि चीन हे संबंध फारसे दृढ असे कधीच दिसले नाही. आता पाकिस्तानचा विचार केला तर मुस्लिम राष्ट्र म्हणून पाकिस्तान आणि युएईमध्ये एक नैसर्गिक युती दिसणे अपेक्षित होते. पण, पाकिस्तानची जागतिक पातळीवर असलेली प्रतिमा, दहशतवादाच्या मुद्याने ग्रासलेला देश यामुळे या देशाशी फारसे संबंध जोडण्यास इथली राजव्यवस्था फारशी अनुकुल नसल्याचे संकेत अनेक घटनांतून मिळाले आहे. दहशतदावाचा बिमोड करण्यासंदर्भात युएई आणि भारत या दोन्ही देशांनी रविवारी १६ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या एकत्रित निवेदनाद्वारे तर हे आणखी अधोरेखित होते. आता मुद्दा राहिला भारत आणि युएई संबंधांचा. तर हे संबंध दृढ होण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे, धर्माधारित राजकारणापेक्षा विकासाभिमुख समाजकारण हे सुत्र दोन्ही देशांनी स्वीकारले आहे, त्यामुळे विकासाचे हे सूत्र दोघांच्याही अजेंड्यावर आहे. तसेच, भारताला मुस्लिम संस्कृती नवीन नाही, युएई या देशाचा जन्म होण्याच्या कित्येक शतकापासून मुस्लिम संस्कृती भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक राहिलेली आहे. संस्कृतीची ही ओळख अगदी इथल्या हिंदीच्या वापरातूनही अधोरेखित होते. त्यामुळेच या दोन्ही देशांनी आर्थिक पातळीवर केलेली हातमिळवणी ही निश्चितच एका नव्या पर्वाची सुरुवात आहे, या दृष्टीने याकडे बघायला हवे. दुबई आणि युएईत वर्षाकाठी अनेक देशांचे प्रमुख खरंतर येत असतात. पण ज्या पद्धतीने भारतीय पंतप्रधानांच्या दौऱ्याचे महत्व राजघराण्यापासून ते माध्यमांपर्यंत आणि इथे वसलेल्या भारतीय नागरिकांपासून ते इथल्या अन्य देशांतील नागरिकांच्या चर्चेतून दिसले ते पाहता एक अनिवासी भारतीय म्हणून भारत नक्कीच विकासाच्या महामार्गावर आहे, याची खात्री मनोमन पटली. ——————————————————चौकट - दुबई क्रिकेट स्टेडियमवर मोदी यांच्या भाषणास ४० हजार भारतीयांसोबतच अरब आणि काही अमेरिकी, युरोपियन लोकांची उपस्थिती ही उल्लेखनीय गोष्ट होती. मोदी यांचे भाषण जरी हिंदीत असेल तरी अनेक अरबांनी त्यातीच ‘पंचेस’ आणि महत्वाचे मुद्दे ‘गोऱ्या’ मंडळींच्या कानात अनुवादित करून सांगितल्याची दृष्ये वेळोवेळी स्क्रीनवर दिसत होती. भारतीय पंतप्रधानांनी हिंदीतून केलेल्या भाषणाचा अरबांनी गोऱ्यां’च्या कानात इंग्रजीतून केलेला हा अनुवाद आणि ते दृष्य यातूनच भारत आणि युएई या दोन देशांना एकमेकांबद्दल असलेले महत्व अधोरेखित होते आणि हीच जगात भारताचे आणि भारतीयांचे वाढणारे महत्व अधोरेखित करणारी बाब आहे. ————————————————-