शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:34 IST

बिहारमध्ये सर्वाधिक जन्मदर २५.८ असून, अंदमान-निकोबारमध्ये सर्वांत कमी १०.१. जन्मदर आहे.

नवी दिल्ली - गेल्या पाच दशकांत देशभरात जन्मदरात मोठी घट झाली आहे. १९७१ मध्ये देशाचा जन्मदर ३६.९ होता. तो २०२३ मध्ये १८.४ झाला आहे. महाराष्ट्रात ह घट अधिक तीव्र आहे. देशाच्या ग्रामीण भागात २०१३ मधील २२.९ वरून २०२३ मध्ये २०.३ तर शहरी भागात २०१३ मधील १७.३ वरून २०२३ मध्ये १४.९ जन्मदर झाला आहे. 

बिहारमध्ये सर्वाधिक जन्मदर २५.८ असून, अंदमान-निकोबारमध्ये सर्वांत कमी १०.१. जन्मदर आहे. महाराष्ट्रात अवघ्या पाच वर्षांत जन्मदर तब्बल २.३ अंकांनी घसरला आहे.

मृत्यूदर काय आहे?चंदीगडमध्ये सर्वांत कमी ४ आणि छत्तीसगडमध्ये सर्वाधिक ८.३ मृत्यूदर नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदर ६.१ आहे. (स्रोत : केंद्राचा एसआरएस अहवाल)

बालमृत्यू दर नीचांकी पातळीवरकेंद्र, राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य योजना, जनजागृती व कुटुंब नियोजनाचा सकारात्मक परिणाम म्हणून भारतातील बालमृत्यू दर २५ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. २०१३ मध्ये हा दर ४० होता. म्हणजे गेल्या दहा वर्षांत यात ३७.५ टक्क्यांची घट झाली आहे. महाराष्ट्रातील बालमृत्यूदर फक्त १४वर आला आहे.

बालमृत्यू सर्वाधिक कुठे?१९७१ मध्ये देशातील बालमृत्यूदर १२९ होता, जो २०२३ मध्ये फक्त २५ झाला. म्हणजे यात ८०% घट झाली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व उत्तर प्रदेशमध्ये बालमृत्यू दर सर्वाधिक ३७ आहे. मणिपूरमध्ये सर्वांत कमी म्हणजे ३ इतका दर. केरळ हे एकमेव मोठे राज्य आहे जिथे एक-अंकी दर नोंदविण्यात आला आहे.