शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोत मिठी मारणाऱ्या जोडप्याला सहप्रवाशांकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 10:06 IST

कोलकातामध्ये मेट्रोत मिठी मारणाऱ्या एका जोडप्याला काही सहप्रवाशांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

कोलकाता- कोलकातामध्ये मेट्रोत मिठी मारणाऱ्या एका जोडप्याला काही सहप्रवाशांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री कोलकाता मेट्रोमध्ये ही घटना घडली. मेट्रोमध्ये प्रवास करत असलेल्या काही वरिष्ठ नागरिकांना मेट्रोमध्ये त्या जोडप्याचं मिठी मारणं खटकलं. म्हणून त्यांनी जोडप्याबरोबर वाद घालत त्यांना मारहाण केली. मेट्रोमध्ये असलेल्या काही वरिष्ठ प्रवाशांनी त्या दोघांना अपमानाप्तद प्रश्न विचारत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. 

दरम्यान, या प्रकरणी कुठलीही तक्रार दाखल झाली नसल्याने तपास करणं कठीण जात आहे, असं कोलकाता मेट्रोचे सीपीआरओ इद्राणी बॅनर्जी यांनी म्हटलं. कोलकाता मेट्रो अशा घटनांचा तीव्र विरोध करतं, असंही ते म्हणाले. 

कोलकाता येथील खासगी कंपनीत काम करणारा तरुण तिच्या मैत्रिणीसह मेट्रो ट्रेनने जात होता. प्रवासादरम्यान त्यांनी एक- दोनदा मिठी मारली. यावरुन मेट्रोमधील काही प्रवासी आक्रमक झाले. त्यांनी थेट त्या दोघांना मारहाण केली. .डमडम मेट्रो स्थानकात या युगूलाला खाली उतरवण्यात आलं. यानंतरही त्यांना मारहाण करण्यात आली. जमावाने तरुणाला मारहाण केली. तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीसोबतही असभ्य वर्तन करण्यात आले. दुसऱ्या डब्यातील काही प्रवाशांनी शेवटी त्या दोघांची मदत केली. 

दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी डमडम मेट्रो स्टेशनच्या बाहेर मंगळवारी निदर्शनं करण्यात आली.