शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

हा देश हिंदूंमुळे नव्हे तर भारतीय संविधानामुळे सेक्युलर; असदुद्दीन ओवैसी यांचा मोदींवर घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 19:37 IST

पहिल्यांदा सरकारने एनआरसी लागू करणे गरजेचे होते. सरकार देशातील १२० कोटी जनतेला रांगेत उभं करणार आहे

ठळक मुद्देकेंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार नकवी आणि एमआयएम प्रमुख ओवैसी यांच्यात वादविवाद या कायद्यानंतर देशात अल्पसंख्याकांसोबत भेदभाव केला जाईलकोणत्याही गोष्टीला आव्हान देण्याचा अधिकारही संविधानाने दिला आहे

नवी दिल्ली - इतर देशातील अल्पसंख्याक हिंदूंना भारताची नागरिकत्वा देण्याला आमची काहीही अडचण नाही. सरकारला वाटत असेल तर पाकिस्तानातून सर्व हिंदूंना बोलावून त्यांना भारतीय नागरिकत्व देऊ शकते. पण धर्माच्या आधारे सुधारित नागरिकत्व कायदा लागू करणं हे संविधानाच्या विरोधात आहे असा घणाघात असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर केला आहे. 

आजतक या वृत्तवाहिनीवर बोलताना ओवैसी म्हणाले की, पंडित नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आणि राजेंद्र प्रसाद यांच्यापेक्षा जास्त ज्ञान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना आहे का? या लोकांना देशाचं संविधान बनवले आहे. जे काम या महापुरुषांनी केलं नाही ते शहा-मोदी करायला जात आहेत. या कायद्यानंतर देशात अल्पसंख्याकांसोबत भेदभाव केला जाईल. कोणत्या हिंदू आणि मुस्लीमाचे नाव एनआरसी यादीत आढळलं नाही तर हिंदू वाचेल पण मुस्लीम वाचू शकणार नाही असा आरोप त्यांनी केला. 

पहिल्यांदा सरकारने एनआरसी लागू करणे गरजेचे होते. सरकार देशातील १२० कोटी जनतेला रांगेत उभं करणार आहे आणि त्यानंतर त्यांना कागदपत्रे मागणार आहे. हिंदूंना वाटतं म्हणून देश धर्मनिरपेक्ष नाही तर संविधानाने देशाला सेक्युलर बनवले आहे. संविधानाच्या अधीन राहून जे निर्णय होतात तसे त्याला आव्हान देण्याचा अधिकारही संविधानाने दिला आहे असं असदुद्दीने ओवैसी यांनी सांगितले. नागरिकता धर्म या चर्चासत्रादरम्यान, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यात वाद रंगला होता. एकीकडे मुख्तार अब्बास नकवी सरकारने आणलेल्या विधेयकाचे जोरदार समर्थन करत होते तर असदुद्दीने ओवैसी सरकारच्या कायद्याविरोधात त्रुटी काढत होते. 

एनआरसी मुद्द्यावर मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, देशातील नागरिकांकडे एकही कागदपत्रे नाही असं कधी होणार नाही. एनआरसीमधून जे लोक बाहेर झालेत त्यांना अपील करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच सुधारिक नागरिकत्व कायदा हा देशातील नागरिकांसाठी नाही. हा कायदा अफगाणिस्तान, बांग्लादेश, पाकिस्तान या देशातील अल्पसंख्याकांसाठी आहे. त्यामुळे एनआरसी आणि हा कायदा एकत्र जोडू नका असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीHinduहिंदूMuslimमुस्लीमcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीBJPभाजपा