शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लसीच्या १२२ कोटी मात्रांची देशाला गरज, केंद्राचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 05:59 IST

केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

ठळक मुद्दे१ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले. या वयोगटातील नागरिकांची संख्या ५९ कोटी असून, यांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यासाठी एकूण १२२ कोटी मात्रांची गरज भासेल.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : १८ ते ४५ या वयोगटातील ५९ कोटी लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी लसीच्या १२२ कोटी मात्रांची गरज भासेल. यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्राने सुप्रीम कोर्टात दाखल केले. 

१ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले. या वयोगटातील नागरिकांची संख्या ५९ कोटी असून, यांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यासाठी एकूण १२२ कोटी मात्रांची गरज भासेल. सद्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी देशात मर्यादित प्रमाणात उपलब्ध  आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच लसींचा तुटवडा भासू नये म्हणून जलद गतीने मंजुरी देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचेही केंद्राने या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. 

‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन वाढवणारn रशियन बनावटीच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला केंद्राने मंजुरी दिली असून, लवकरच या लसीचे  देशांतर्गत उत्पादन सुरू होणार असल्याचे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. n जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ‘स्पुटनिक व्ही’ लसीच्या अनुक्रमे ८० लाख आणि १ कोटी ६० लाख मात्रा उपलब्ध होणार असल्याचेही त्यात नमूद आहे. याशिवाय फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांशीही लसीसाठी चर्चा सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस