ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीच्या कलामध्ये तरी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. राज्याच्या २८८ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या तासाभरामध्ये भाजपाने २८६ पैकी १२५ जागांवर शिवसेनेने ७० जागांवर, काँग्रेसने ३२, राष्ट्रवादीने ४० व मनसेने ४ जागांवर आघाडी घेतली आहे. अर्थात, भाजपाने आघाडी घेतली असली तरी निर्विवाद बहुमत मिळेल की नाही अशी शंकाच दिसत आहे.
काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांना तसेच राष्ट्रवादीलाही अनेक ठिकाणी आघाडी मिळाल्यामुळे भाजपाचे शतप्रतिशत भाजपाचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत अशी शक्यता आहे.
विशेष म्हणजे काही ठिकाणी मातब्बरांना धक्का बसण्याचे संकेत आहेत.
तासगावमध्ये आर. आर. पाटील पिछाडीवर असून राहूल ठाकरेही मागे पडले आहेत. तर पंकजा मुंडे, पृथ्वीराज तव्हाण, अजित पवार, राम कदम, विनायक मेटे, पंकज भुजबळ आघाडीवर आहेत. नारायण राणे व नितेश राणे आघाडीवर आहेत. गुहागरमध्ये भास्कर जाधव आघाडीवर आहेत.
हरयाणामध्ये भाजपाने ९० पैकी ४५ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा अपेक्षेप्रमाणे बहुमत मिळवेल अशी चिन्हे आहेत.