कोर्टात बनावट कागदपत्रे अन् बनावट इसमही कोर्टात उभा
By admin | Updated: September 3, 2015 23:52 IST
नागपूर : केवळ कागदपत्रेच नव्हे तर बनावट इसम (एकाच्या नावाखाली दुसराच) उभा करून कोर्टाची फसवणूक करणाऱ्या आरोपींवर सदर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. केतन खुशाल रंगारी आणि एस. एच. सुदामे, अशी या प्रकरणातील मुख्य आरोपींची नावे आहेत. या दोघांनी आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने एका गुन्ह्यात आरोपीची जमानत घेण्यासाठी जमानतदार संजय लालजी ...
कोर्टात बनावट कागदपत्रे अन् बनावट इसमही कोर्टात उभा
नागपूर : केवळ कागदपत्रेच नव्हे तर बनावट इसम (एकाच्या नावाखाली दुसराच) उभा करून कोर्टाची फसवणूक करणाऱ्या आरोपींवर सदर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. केतन खुशाल रंगारी आणि एस. एच. सुदामे, अशी या प्रकरणातील मुख्य आरोपींची नावे आहेत. या दोघांनी आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने एका गुन्ह्यात आरोपीची जमानत घेण्यासाठी जमानतदार संजय लालजी मंगम यांच्याशी संबंधित बनावट सालवन्सी तसेच संबंधित बनावट कागदपत्रे तयार केली. एवढेच नव्हे तर एका व्यक्तीच्या नावाने भलताच इसम कोर्टात उभा केला. २६ ऑगस्टच्या पूर्वी ही बनवाबनवी करण्यात आली. तो गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर ज्ञानेश्वर पंचम निमजे (सहायक अधीक्षक कोर्ट क्र. ६) यांनी सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. ----