शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Mission Moon ! 'चांद्रयान-2' चे काउंटडाऊन सुरू, मध्यरात्री अवकाशात झेपावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 11:28 AM

'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'

श्रीहरिकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे हे यान चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास चंद्रावर उतरणारा भारत हा जगातला चौथ्या क्रमांकाच देश ठरणार आहे.

आज सकाळी 6.51 वाजता 20 तासांसाठी चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. शिवन यांनी सांगितले की, आतापर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरु आहे. चांद्रयान-2 ला इस्त्रोचे सर्वात शक्तिशाली रॉकेट जीएसएलव्ही -MK-3 अंतराळात घेऊन झेपावणार आहे.  

(चांद्रयान-2 चं थेट प्रक्षेपण पाहायचं आहे, मग इथे करा ऑनलाइन नोंदणी)

चांद्रयान-2 मोहिमेसाठी तीन मॉड्युल्स तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एक ऑर्बिटर, लँडर आणि एका रोव्हरचा समावेश आहे. त्यांना लाँच व्हेइकल जीएसएलव्ही -MK-3 अंतराळात घेऊन जाईल. विशेष म्हणजे हे लाँच व्हेइकल भारतातच बनवण्यात आले आहे. चांद्रयान-2च्या लँडरला विक्रम आणि रोव्हरला प्रज्ञान नाव देण्यात आले आहे. रोव्हर प्रज्ञानला लँडर विक्रमच्या आत ठेवण्यात येईल. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमचे लँडिंग झाल्यानंतर त्याला बाहेर आणले जाईल.

'चांद्रयान-2'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी  15 जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान 2 मोहिमेद्वारे चंद्रावर यान पाठविणार आहे. या मोहिमेसाठी ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या प्रक्षेपास्त्राचा वापर करण्यात येणार असून त्याला अवकाशात झेपावण्यासाठी लागणारे बूस्टरचे केसिंग पुणे येथीलइंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविण्यात आले आहे. या प्रकारची क्षमता असणारा भारत जगातील पाचवा देश ठरला आहे.

(UPA सरकारमुळे 'चांद्रयान -2'च्या लाँचिंगला उशीर, माजी इस्त्रो अध्यक्षांचा आरोप)

भारताची पुढील महत्त्वाकांक्षा अंतराळात स्वत:च्या तळाची!नजीकच्या भविष्यात स्वत:चा स्वतंत्र अंतराळ तळ उभारण्याची भारताची योजना असून यानाने पहिला अंतराळवीर अंतरिक्षात पाठविण्याची ‘गगनयान’ मोहीम ऑगस्ट 2022 मध्ये पार पाडल्यानंतर अंतराळतळाची योजना राबविण्याची तयारी जोमाने सुरू केली जाईल, असे भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. शिवन यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. ‘गगनयान’ मोहीम पार पडल्यानंतर अंतराळ तळ उभारणीच्या योजनेचा प्रकल्प अहवाल सरकारला सादर केला जाईल. अंतराळात अल्प गुरुत्वाकर्षणात नानाविध प्रयोग करण्यासाठी आपलाही स्वतंत्र अंतराळ तळ असावा, ही भारताची महत्त्वाकांक्षा आहे. तिला मूर्त रूप देण्यासाठी नेटाने प्रयत्न केले जातील, असेही डॉ. शिवन यांनी सांगितले होते.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2