शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात; उद्यापासून नवे दर लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 19:57 IST

गेल्या दोन महिन्यांत सिलिंडर १२५ रुपयांनी महागलेला सिलिंडर अखेर स्वस्त

मुंबई: पेट्रोल, डिझेलसोबतच गेल्या काही महिन्यांत एलपीजी सिलिंडरचे दरदेखील गगनाला भिडले. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे अन्नधान्याचे दर वाढले असताना त्यात सिलिंडरच्या वाढत्या दरांनी आणखी भर घातली. मात्र उद्यापासून सिलिंडरच्या दरात कपात होणार आहे. इंडियल ऑईल कॉर्पोरेशननं याबद्दलची माहिती दिली आहे. उद्यापासून सिलिंडरच्या दरात १० रुपयांनी कपात होणार आहे. (Cost Of Domestic LPG Cylinder To Reduce From April 1)पेट्रोल-डिझेल होऊ शकते आणखी स्वस्त; ग्राहकांना फायदा होणारसिलिंडरचे नवे दर १ एप्रिलपासून लागू होणार असल्याचं इंडियल ऑईल कॉर्पोरेशननं सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घसरले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरातही घसरण होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या आठवड्याभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात तीनवेळा कपात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची स्थिती पाहता यात आणखी घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

गुड न्यूज! आता घरबसल्या ऑर्डर करा; पेट्रोल-डिझेलची मुंबई व दिल्लीत होम डिलिव्हरीसध्या १४.३ किलोग्रॅमच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी मुंबईत ८१९ रुपये मोजावे लागतात. दिल्लीतही सिलिंडरचा दर इतकाच आहे. तर कोलकात्यात सिलिंडरसाठी ८४५.५० रुपये, चेन्नईत ८३५ रुपये मोजावे लागतात. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं सिलिंडरच्या दरात कपात केल्यानं उद्यापासून मुंबई, दिल्लीत सिलिंडर ८०९ रुपयांना मिळेल. तर कोलकात्यात ८३५.५० रुपयांना आणि चेन्नईत ८२५ रुपयांना मिळेल.गेल्या २ महिन्यांत सिलिंडर १२५ रुपयांनी महागलागेल्या काही दिवसांपासून घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरांत सातत्यानं वाढ सुरू होती. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये स्वयंपाकाच्या सिलिंडरची किंमत १२५ रुपयांनी वाढली. ४ फेब्रुवारीला सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली. त्यानंतर १५ फेब्रुवारीला सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढला. २५ फेब्रुवारीला २५ रुपयांची, त्यानंतर १ मार्चला २५ रुपयांची वाढ झाली. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर