शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

देशात भ्रष्टाचारात वाढ! १८० देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत कितव्या नंबरवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:27 IST

भारताच्या जवळील भूतानमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार होत असून, मालदीव आणि भारतात भ्रष्टचाराचे प्रमाण सारखेच आहे

नवी दिल्ली - नेते  भ्रष्टाचाराचा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याने तसेच देशांत पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत असल्याने भारतातभ्रष्टाचार आणखी वाढला असल्याचे समोर आले आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या केलेल्या अहवालानुसार १८० देशांत भ्रष्टाचारातील यादीत भारत २०२४ मध्ये ९६ व्या स्थानावर आहे. 

भ्रष्टाचारात शेजारी देश चीन ७६ व्या क्रमांकावर कायम आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचारही वाढला आहे. तो १३३ व्या स्थानावरून १३५ व्या स्थानावर गेला आहे. भ्रष्टाचारात श्रीलंका १२१ व्या, तर बांगलादेश १४९ व्या क्रमांकावर आहे. जगात सर्वांत कमी भ्रष्टाचार हा डेन्मार्कमध्ये होत आहे. फिनलंड दुसऱ्या क्रमांकावर, तर सिंगापूर तिसऱ्या स्थानावर आहे. 

भारताची काय स्थिती? 

अहवालात भारताचा भ्रष्टाचारातील स्कोअर ३८ आहे. हा स्कोअर २०२३ मध्ये ३९, तर २०२२ मध्ये ४० होता. केवळ एक क्रमांक कमी झाल्यामुळे भारताची तीन स्थानांनी घसरण झाली आहे. आशियातील देशांमध्ये, गेल्या ५ वर्षांत स्कोअर ४५ च्या आसपास राहिला आहे. यंदा ते ४४ आहे. फार कमी देशांमध्ये भ्रष्टाचार कमी झाला आहे. आशिया खंडातील बहुतांश देशांमध्ये भ्रष्टाचार हळूहळू वाढला आहे. भारतासह आशियातील ७१ देशांचा स्कोअर सरासरीपेक्षा (४५) कमी आहे. भारताच्या जवळील भूतानमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार होत असून, मालदीव आणि भारतात भ्रष्टचाराचे प्रमाण सारखेच आहे. बांगलोदेशची स्थिती पाकिस्तानपेक्षा वाइट असून, येथे भ्रष्टचाराचे प्रमाण वाढले आहे.

लोकशाहीत की स्वैरशासित देशांत होतो भ्रष्टाचार? 

लोकशाही मजबूत असलेल्या देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी आहे. पूर्णपणे लोकशाही असलेल्या २४ देशांचा स्कोअर ७३ आहे. अर्धवट लोकशाही म्हणजेच लोकशाही असली तरी काही मूलभूत त्रुटी असलेल्या ५० देशांचा स्कोअर ४७ आहे, तर स्वैरशासित सत्ता म्हणजेच जिथे नागरिकांच्या हक्कांवर बंधने असतात आणि सत्ता एकाधिकारशाही पद्धतीने चालवली जाते, अशा ९५ देशांचा स्कोअर ३३ आहे. लोकशाही संस्थांत कमकुवतपणा आला असून राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप वाढला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

भ्रष्टाचारामुळे काय होतेय? 

भ्रष्टाचारामुळे पर्यावरणीय धोरणांवर नकारात्मक परिणाम होत आहे. उद्योग आणि राजकीय नेत्यांमध्ये असलेल्या लागेबंधांमुळे प्रभावी धोरणे आणली जात नाहीत. हवामान निधीचा गैरवापर होत आहे. विविध प्रकल्पांमध्ये अपारदर्शकता आली आहे. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारIndiaभारतchinaचीन