शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांनी निराधारांना फेकले रस्त्यावर, इंदूरमधील व्हिडिओ फितीमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 04:35 IST

Indore News : गेली चार वर्षे देशामधील सर्वांत स्वच्छ शहर असा किताब मिळविलेल्या इंदूरमधील महापालिका कर्मचाऱ्यांनी निराधार, वयोवृद्ध लोकांना गोळा करून त्यांना शहराबाहेर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला प्रचंड थंडीत वाऱ्यावर सोडून दिले.

- मुकेश मिश्राइंदूर : गेली चार वर्षे देशामधील सर्वांत स्वच्छ शहर असा किताब मिळविलेल्या इंदूरमधील महापालिका कर्मचाऱ्यांनी निराधार, वयोवृद्ध लोकांना गोळा करून त्यांना शहराबाहेर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला प्रचंड थंडीत वाऱ्यावर सोडून दिले. या अमानुष कृत्याची व्हिडिओफित समाजमाध्यमावर झळकली असून, त्यामुळे खळबळ माजली आहे. राजेश जोशी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कारवाईचे निर्देश दिले. या प्रकरणी उपायुक्त प्रताप सोळंकी यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, सुपरवाइझर बृजेश लश्करी व विश्वास बाजपेयी यांना बरखास्त करण्यात आले आहे. या वयोवृद्धांना कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या कडेला नेवून टाकण्याचे कृत्य करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा क्षिप्रा परिसरातील गावकऱ्यांनी निषेध केला, तसेच या वयोवृद्धांना परत शहरात आणण्याची मागणी केली. महामार्गाच्या लगत थांबविलेल्या एका ट्रकमधून महापालिका कर्मचाऱ्यांनी निराधार वयोवृद्धांना खाली उतरविले व रस्त्याच्या कडेला सोडून दिले. त्या प्रसंगाचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांपैकी काही जणांनी चित्रीत केला. त्यामुळे या घटनेला वाचा फुटली आहे.  या निराधार लोकांना त्यांच्या सामानासुमानासह कशा प्रकारे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला फेकून देण्यात आले, याची कहाणी एक स्थानिक नागरिक आणखी एका व्हिडिओत सांगत आहे.  

मानवतेवरील कलंक काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारवर टीका करताना ट्वीट केले आहे की, हा मानवतेवरील कलंक आहे. अभिनेते सोनू सूद यांनी या लोकांची राहण्याची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली.  महापालिकेने आरोप फेटाळले इंदूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभय रांजणगावकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, महापालिका कर्मचारी बेघर, निराधार वयोवृद्धांना निवारा छावणीमध्ये नेत होते. मुरलीमनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी या नेत्यांना जसे दूर सारले तसेच भाजपचे लोक इंदूरमधील वयोवृद्धांशी वागत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत