टाटा समूहातील कॉर्पोरेट गव्हर्नन्सची सेबीकडून चौकशी ?

By admin | Published: October 27, 2016 11:23 AM2016-10-27T11:23:00+5:302016-10-27T11:40:16+5:30

टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी हटवल्यानंतर या समूहामध्ये घडणा-या घडामोडींवर सेबी बारीक लक्ष ठेवून आहे.

Corporate Governance of Tata Group Sebi interrogated? | टाटा समूहातील कॉर्पोरेट गव्हर्नन्सची सेबीकडून चौकशी ?

टाटा समूहातील कॉर्पोरेट गव्हर्नन्सची सेबीकडून चौकशी ?

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २७ - टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी हटवल्यानंतर या समूहामध्ये घडणा-या घडामोडींवर सेबी बारीक लक्ष ठेवून आहे. सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाला पाठवलेले कथित पत्र फुटले त्यातून कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा (संचालन) मुद्दा समोर आला आहे. टाटा समूहात कॉर्पोरेट  गव्हर्नन्सचा अभाव असल्याचा आरोप सायरस मिस्त्री यांनी केला आहे. 
 
सेबीने अजून या विषयात थेट हस्तक्षेप केला नसला तरी, फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार  कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या मुद्याची चौकशी करण्यावर सेबीचा विचार सुरु आहे. शेअर बाजाराचे नियमन करणा-या सेबीने सुरुवातीपासून कॉर्पोरट क्षेत्राचे कामकाज नियमानुसार चालवण्यावर भर दिला आहे. 
 
आणखी वाचा 
नॅनो कार तोट्याची, सायरस मिस्त्रींचा रतन टाटांवर हल्लाबोल
 
सायरस मिस्त्री यांच्या फुटलेल्या कथित पत्रातून रतन टाटा आणि त्यांच्यामधील मतभेद स्पष्टपणे समोर आले आहेत. टाटा समूहात आपल्या निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले नाही असा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. 
 

Web Title: Corporate Governance of Tata Group Sebi interrogated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.