शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ...म्हणून निरोगी रुग्णांना पुन्हा होतोय कोरोना; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 09:16 IST

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील एका निवेदनात या संबंधित प्रकाराची नोंद घेतली आहे.

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसपासून निरोगी झालेल्या रुग्णांपैकी अनेक रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वुहानमधील डॉक्टरांना कोरोनापासून निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली होती. त्यातच आता दिल्लीतील नोएडामध्ये देखील असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

कोरोनापासून निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होण्याच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नोएडा येथील दोन रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र काही दिवसांनी तिसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुन्हा कोरोनाची लागण होण्यामागील कारण मात्र अजूनही आरोग्य विभागातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनासुद्धा समजू शकलेले नाही. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान जी औषधं वापरली जातात, त्याचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा शरीरात कोरोना विकसित होतो की काय अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेना (WHO) ने देखील एका निवेदनात या संबंधित प्रकाराची नोंद घेतली आहे. कोरोनाबाधित रुग्ण निरोगी झाल्यानंतर त्यांची दोन वेळा चाचणी करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. तसेच काहीवेळा रुग्णांच्या शरीरातील विषाणू पूर्णपणे मरण पावला नसेल, तरी अशा रुग्णाला पुन्हा कोरोना होऊ शकतो असा दावा केली जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. त्यामुळे शरीरात असलेल्या विषाणूची तपासणी केली पाहिजे असं मत आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे.

दरम्यान, पीपल्स डेलीच्या हेल्थ जर्नल लाइफ टाईम्सनेही दावा केला आहे की, वुहानमध्ये बरे झालेल्या कोरोना रूग्णांपैकी १०% रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी ८% ते १०% रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे एकठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्यामुळे चीनसमोर आता नवीन संकट उभं राहिलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdocterडॉक्टरWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाdelhiदिल्ली