शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : चक्क दारूच्या दुकानाबाहेर 'घुंघट'मध्ये महिला, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 17:10 IST

राजस्थानमधील जयपुरमधला एक व्हिडीओ पाहिला तर यामध्ये रांगेत उभ्या असणा-या महिला स्वतःहून रांगा लावून उभ्या नव्हत्या.

आजही देशातील काही भागांमध्ये घुंघट प्रथा कायम आहे. यामध्ये राजस्थान आघाडीवर आहे. तेथील महिला नेहमीच घुंघटमध्ये राहणे पसंत करतात. सभ्यतेचे दर्शन म्हणून घुंघट घेण्याची प्रथा असताना दारूच्या दुकानाबाहेर घुंघटमध्ये काही महिलांची रांग लागल्याचे पाहून अनेकांना धक्काच बसेल. पण त्यामागे काही कारण आहे.गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करत दारूची दुकाने उघडण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. त्यानंतर दारूच्या दुकानाबाहेर मद्यप्रेमींनी लांबच लांब रांगा लावल्याचे दिसून आले. मात्र, राजस्थानमधील जयपुरमधला एक व्हिडीओ पाहिला तर यामध्ये रांगेत उभ्या असणा-या महिला स्वतःहून रांगा लावून उभ्या नव्हत्या. तर त्यांच्या नव-यांनीच त्या महिलांना दारू खरेदीसाठी पाठविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

दुसरीकडे, देशातील विविध भागात महिलाच दारुविक्रीला विरोध करताना दिसतात. मात्र राजस्थानमधील महिला याला पाठिंबा देत असल्याचीही चर्चाही सुरू आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मद्यप्रेमींनी रांगेत उभे राहण्याची मेहनत वाचावी म्हणून त्यांनी त्यांच्या बायकांना रांगेत उभे केल्यामुळे अनेक नेटीझन्स संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, दारू खरेदीसाठी उडालेली झुंबड आणि नागरिकांची बेशिस्त वागणूक पाहून काही शहरामध्ये पुन्हा दारूची दुकाने उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. 

मुंबईमध्ये दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच,  मुंबईप्रमाणे इतर ठिकाणी होणारी दारू विक्रीदेखील बंद करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या