शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : योगी सरकारने 27 लाख मनरेगा मजुरांच्या खात्यात जमा केले 611 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 12:16 IST

लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नयोगी सरकारने उत्तर प्रदेशमधील सुमारे 27 लाख मनरेगा मजुरांच्या खात्यात एकूण 611 कोटी रुपये जमा केले योगी सरकारने राज्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या सुमारे 20 लाख मजुरांच्या खात्यात यापूर्वीच प्रत्येकी एक हजार रुपये जमा केले होते.

लखनौ -  कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या अडचणीत असलेल्या मजुरांच्या मदतीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पुढाकार घेतला आहे. योगी सरकारने उत्तर प्रदेशमधील सुमारे 27 लाख मनरेगा मजुरांच्या खात्यात एकूण 611 कोटी रुपये जमा केले आहेत. दरम्यान, योगी सरकारने राज्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या सुमारे 20 लाख मजुरांच्या खात्यात यापूर्वीच प्रत्येकी एक हजार रुपये जमा केले होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, अंत्योदय योजना, मनरेगा आणि श्रम विभागात नोंद असलेल्या सुमारे एक कोटी 65 लाख 31 हजार मजुरांना एका महिन्याचे धान्य मोफत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कुटुंबांना   20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ मोफत मिळतील. त्याशिवाय निवृत्ती वेतनाचा लाभ घेणाऱ्या 83 लाख 83 हजार जणांना दोन महिन्यांचे निवृत्तीवेतन आगावू देण्यात येत आहे.दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी रविवारी सुमारे 1 लाख 63 हजार  भाजपा कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी योगी यांनी अधिकाधिक लोकांना भाजपा कार्यकर्त्यांनी मदत करावी, असे आवाहन केले.  तसेच भाजपाच्या एका बुथ प्रमुखाने किमान 10 गरीबांच्या भोजनाची व्यवस्था करावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ