शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पुढील २ महिने खूप महत्त्वाचे; देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाटच सुरू, केंद्र सरकार सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 18:21 IST

कोविड १९ विरुद्ध लसीकरण हे कोरोना प्रसार रोखण्यासाठी आहे. रोग बरा करण्यासाठी नाही

ठळक मुद्देदेशातील ४१ जिल्ह्यात कोरोना संक्रमण दर १० टक्क्याहून जास्त आहे. देशात कोविड १९ ची दुसरी लाट अद्यापही जारी आहेसप्टेंबर-ऑक्टोबर महिना देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या काळात देशात अनेक ठिकाणी उत्सव आहेत एका दिवसात कोरोना व्हायरसचे ४६ हजार १६४ रुग्ण आढळले आहेत.

नवी दिल्ली – देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट होत असतानाच केरळमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. मागील २४ तासांत कोविड १९ चे ५८ टक्क्याहून जास्त रुग्ण एकट्या केरळमध्ये आढळले आहेत. केरळ हे एकमेव राज्य आहेत ज्याठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या १ लाखाहून जास्त आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या ४ राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या दहा हजार ते १ लाखाच्या दरम्यान आहे अशी मागिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशातील ४१ जिल्ह्यात कोरोना संक्रमण दर १० टक्क्याहून जास्त आहे. देशात कोविड १९ ची दुसरी लाट अद्यापही जारी आहे. दुसरी लाट संपली नाही. त्यामुळे लोकांना सतर्क राहणं गरजेचे आहे. विशेषत: सण-उत्सवानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिना देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या काळात देशात अनेक ठिकाणी उत्सव आहेत. त्यामुळे कोविडचे नियम पाळूनच उत्सव साजरे केले पाहिजेत असं आवाहन त्यांन केले.

तसेच कोविड १९ विरुद्ध लसीकरण हे कोरोना प्रसार रोखण्यासाठी आहे. रोग बरा करण्यासाठी नाही. त्यामुळे लसीकरणानंतरही लोकांनी मास्कचा वापर करायला हवा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका दिवसात कोरोना व्हायरसचे ४६ हजार १६४ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर भारतातील कोविड १९ एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २५ लाख ५८ हजार ५३० झाली आहे. सकाळी ८ च्या आकडेवारीनुसार ६०७ लोकांच्या मृत्यूनंतर देशभरात मृतांची संख्या ४ लाख ३६ हजार ३६५ इतकी झाली आहे.

केरळमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या

केरळ आरोग्य विभागाकडून बुधवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात ३१ हजार ४४५ रुग्ण समोर आले आहेत. त्यानंतर एकूण रुग्णसंख्या ३८ लाख ८३ हजार ४२९ इतकी झाली आहे. २१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये शनिवारी १७ हजार १०६, रविवारी १० हजार ४०२, सोमवारी १३, ३८३ आणि मंगळवारी २४ हजार २९६ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या