शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

CoronaVirus: मोदींच्या 'आत्मनिर्भर' पॅकेजला वर्ल्ड बँकेकडून बूस्टर; मोठ्या मदतीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 12:00 IST

वर्ल्ड बँकेनं तिजोरी उघडली; भारतासाठी १ बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या भारताला जागतिक बँकेनं मोठा दिलासा आहे. जागतिक बँकेनं सरकारच्या योजनांसाठी १ बिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर केलं आहे. हे पॅकेज सामाजिक सुरक्षेसाठी असेल, असं बँकेनं म्हटलं आहे. याआधी कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेनं (एनडीबी) एक अब्ज डॉलरचा आपत्कालीन निधी जाहीर केला होता. जागतिक बँकेनं मुख्यत: शहरी गरीब आणि स्थलांतरित मजुरांसाठी मदत जाहीर केली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न झाल्यानं लाखो मजूर त्यांच्या गावाकडे परतत असल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. त्यांच्यासाठी जागतिक बँकेनं सामाजिक सुरक्षा पॅकेज जाहीर केलं आहे. सरकारच्या ४०० हून अधिक सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्यात येईल, असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.कोरोना संकटाच्या काळात निर्माण झालेला सामाजिक असमतोल दूर करण्याच्या दृष्टीनं १ बिलियन अमेरिकन डॉलरचं पॅकेज उपयोगी ठरेल, असं मत जागतिक बँकेचे देशपातळीवरील संचालक जुनैद अहमद यांनी व्यक्त केलं. 'पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेलं आत्मनिर्भर पॅकेज अतिशय महत्त्वाचं आहे. जनतेचं आयुष्य आणि त्यांचा चरितार्थ यांच्या दृष्टीनं सरकारनं मांडलेली भूमिका योग्य आहे,' असं अहमद म्हणाले.१ बिलियन डॉलरच्या पॅकेजमधून नेमकी कोणाकोणाला मदत केली जाईल, याची माहितीदेखील अहमद यांनी दिली. वर्ल्ड बँकेकडून देण्यात आलेल्या पॅकेजचा वापर सामाजिक सुरक्षेसाठी करण्यात येईल. आम्ही सरकारसोबत काम करू. सामाजिक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लोकांना स्थलांतरित व्हावं लागू नये. एकीकडून दुसरीकडे जावं लागू या दृष्टीनं जागतिक बँक प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीWorld Bankवर्ल्ड बँक