शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

CoronaVirus: तिसरी लाट खरंच धोकादायक ठरणार? जागतिक आरोग्य संघटना आणि एम्सन केला असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 09:25 IST

जागतिक आरोग्य संघटना आणि एम्स यांनी ४५०० लोकांच्या डेटाचा अभ्यास केल्यानंतर तिसऱ्या लाटेबाबत भाष्य केले.

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरल्यात जमा आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी तिचा प्रभाव टिकून आहे. त्यातच डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या अवताराने डोके वर काढले आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट निर्माण होण्याचा धोका असल्याचे बोलले जात आहे. खरंच तिसरी लाट येणार आहे का, आल्यास ती किती आणि कोणासाठी धोकादायक असेल, याची चर्चा होणे गरजेचे आहे. 

ऑक्टोबरमध्ये येणार तिसरी लाट रॉयटर्स या संस्थेचा दावा रॉयटर्सने दाव्याच्या पुष्टीसाठी ३ ते १७ जून या कालावधीत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी, डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ इत्यादींशी चर्चा केली, त्यांची मते जाणून घेतली.- या सगळ्यांनी भारतात कोरोनाची तिसरी लाट १०० टक्के येणार असल्याचे सांगितले.- त्यातील ८५ टक्के लोकांनी तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यातच येईल, असा दावा केला. - मात्र, दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसरी लाट तितकीशी भयंकर नसेल, असे अनेकांचे म्हणणे पडले.- लसीकरण आणि औषधे यांमुळे तिसऱ्या लाटेचा धोका जास्त नसेल, असा दावा सर्व तज्ज्ञांनी केला. - १८ वर्षे वयाखालील मुलांसाठी लस उपलब्ध नसल्याने मुलांना तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे काही जणांना वाटते. 

तिसऱ्या लाटेचा धोका मुलांना कमीच, जागतिक आरोग्य संघटना आणि एम्स यांचा दावा -- भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका मुलांपेक्षा ज्येष्ठांनाच अधिक असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटना आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) यांनी एका सर्वेक्षणाच्या आधारावर केला आहे.- जागतिक आरोग्य संघटना आणि एम्स यांनी ४५०० लोकांच्या डेटाचा अभ्यास केल्यानंतर तिसऱ्या लाटेबाबत भाष्य केले.- देशातील काही भागांमध्ये मुलांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याने तिसऱ्या लाटेचा धोका लहानग्यांपेक्षा मोठ्यांना वा ज्येष्ठांना अधिक असेल, असे या दोन्ही संस्थांचे म्हणणे आहे.

६५% लोकांना लहान मुले तसेच १८ वर्षे वयाखालील मुलांना तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे वाटते. ३५% तज्ज्ञांना असा कोणताही धोका मुलांना नसल्याचे वाटते.

महाराष्ट्रात तिसरी लाट भयंकर असेल कोविड टास्क फोर्स- महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने तिसरी लाट महाराष्ट्रासाठी भयंकर असेल असा दावा केला आहे. - तिसऱ्या लाटेचा उच्चांक प्रतिदिन ८ लाख कोरोनाबाधित असा असेल, असेही टास्क फोर्सचे म्हणणे आहे.- त्यांनी सर्वेक्षण आणि विश्लेषण यांच्या आधारावर हे भाकीत केले आहे. - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पाच लाख मुलांना संसर्ग होईल, असेही फोर्सचे म्हणणे आहे. - डेल्टा प्लसचे बाधितही महाराष्ट्रात आढळून आले आहेत. - तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. कोविड - केंद्रे मोठ्या संख्येने उभारण्यात आली आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस