शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

भारतात लहान मुलांसाठी कोरोना लस केव्हा येणार?; एम्स प्रमुखांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 13:00 IST

Coronavirus Vaccine : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात माजला होता हाहाकार. सध्या लहान मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचीही सुरू आहे चाचणी. 

ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात माजला होता हाहाकार.सध्या लहान मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचीही सुरू आहे चाचणी. 

Coronavirus Vaccination In India for Kids : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु आता लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. भारतात. सप्टेंबर महिन्यापर्यंत लहान मुलांच्या लसीकरणाची सुरूवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एम्सचे प्रमुख डॉ.रणदीप गुलेरिया यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

लहान मुलांना देण्यात येणारी कोरोना प्रतिबंधात्मक लस कोवॅक्सिनची चाचणी सध्या सुरू आहे आणि त्याचा अहवाल सप्टेंबरपर्यंत मिळण्याची अपेक्षा असल्याचं गुलेरिया म्हणाले. फायझरच्या लसीला यापूर्वी FDA ची मंजुरी मिळालीआहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत लहान मुलांचं लसीकरण सुरू केलं गेलं पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं.डिसेंबर पर्यंत १०० कोटी डोसयेत्या डिसेंबर महिन्यापर्यंतच्या कालावधीसाठी केंद्र सरकारने कोरोना लसींच्या १००.६ कोटी डोसची मागणी उत्पादक कंपन्यांकडे नोंदविली आहे. ही माहिती शुक्रवारी लोकसभेत देण्यात आली. देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना डिसेंबरपर्यंत लस देण्यासाठी २१६ कोटी डोसची गरज भासणार असल्याचे केंद्र सरकारनेच याआधी म्हटले होते. त्या तुलनेत सरकारने मागविलेल्या डोसची संख्या खूप कमी आहे. 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, कोरोना लसींच्या खरेदीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ८०७१.०९ कोटी रुपये यंदाच्या जुलै महिन्यापर्यंत लसखरेदीसाठी खर्च करण्यात आले. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक-व्ही या तीन लसींना केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. तसेच मॉडेर्ना लसीची निर्यात करण्यास मुंबईतील सिप्ला कंपनीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. बायोलॉजिकल ईच्या कोरोना लसीचे ३० कोटी डोस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने १५०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम त्या कंपनीला दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतlok sabhaलोकसभा