शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीच्या बूस्टर डोससाठी नवीन नोंदणी करावी लागणार नाही, शुल्क 150 रुपयांपेक्षा जास्त नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:58 IST

coronavirus vaccine booster dose : या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायच्या संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी आता 18 ते 59 वर्षे वयोगटातील लोकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बूस्टर डोस 10 एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होईल. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांच्या आरोग्य सचिवांना सांगितले आहे की, खाजगी लसीकरण केंद्रांनी कोरोना लसीच्या बूस्टर डोस लोकांना देताना 150 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारू नये. हे 150 रुपयांचे कमाल शुल्क कोरोना लसीच्या किमतीपेक्षा वेगळे असेल. तसेच, ज्या व्यक्तीला लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळाला आहे, त्याच व्यक्तीला लसीचा बूस्टर डोस घेता येणार आहे. बूस्टर डोससाठी कोणतीही नवीन नोंदणी करावी लागणार नाही. कोविन अॅपवर आधीच केलेल्या नोंदणीद्वारे बूस्टर डोस दिला जाईल, असेही केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले. 

खाजगी लसीकरण केंद्रांमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाचा बूस्टर डोस उपलब्ध करून दिला जाईल. ही सुविधा सर्व खाजगी लसीकरण केंद्रात उपलब्ध असेल,अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दुसरीकडे, लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटले आहे की, पात्र लोकांसाठी त्यांच्या कोविशील्ड लसीच्या बूस्टर डोसची किंमत प्रति डोस 600 रुपये असेल.

सध्या देशात कोरोना लसीचे वेगवेगळे डोस कोणत्याही व्यक्तीला देण्याची परवानगी नाही, याचा अर्थ बूस्टर डोस हा त्याच लसीचा असेल जो पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये देण्यात आला होता. दरम्यान, बूस्टर डोसबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर म्हटले होते की, "कोरोनाविरुद्धची लढाई आता अधिक मजबूत होईल. आता 18 वर्षांवरील नागरिकांना 10 एप्रिलपासून खासगी केंद्रांमध्ये बूस्टर डोस घेता येणार आहेत. ज्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले आहेत, ते  बूस्टर डोससाठी पात्र असतील."

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य