शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : नवीन व्हॅक्सिन पॉलिसी ठरली फायदेशीर! मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये दुप्पट लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 09:09 IST

Coronavirus : मे महिन्यात सरकारने 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली : कोरोना विरोधात सुरू असलेल्या लसीकरणाची आकडेवारी चांगली दिसून येत आहे. मे महिन्यात कमी झालेल्या या लसीकरणाची गती जूनमध्ये पुन्हा वाढली आहे. मेच्या तुलनेत जूनमध्ये दररोज सरासरी दुप्पट लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच, मे ते जून या कालावधीत मासिक लसीकरणात 97 टक्के वाढ झाली आहे. या काळात दररोज होणाऱ्या लसीकरणात 102 टक्के वाढ झाली आहे. 

30 मे रोजी केंद्र सरकारने देशाला आश्वासन दिले होते की, जूनमध्ये 11 कोटी 95 लाख 70 हजार लसींच्या डोसचा पुरवठा केला जाईल. तर जूनमध्ये दररोज 39 लाख 88 हजार 979 च्या सरासरीपेक्षा 11 कोटी 96 लाख 69 हजार 381 डोस देण्यात आले. तर, मे महिन्यात दररोज 19 लाख 69 हजार 580 च्या सरासरीत ही आकडेवारी  6 कोटी 10 लाख 57 हजार 003 इतकी होती. मे महिन्यात सरकारने 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला होता.

एप्रिलच्या तुलनेत जूनमध्ये लसीकरणात 33.15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये दररोज 29 लाख 95 हजार 724 डोसच्या सरासरीने एकूण 8 कोटी 98 लाख 71 हजार 739 लोकांना लस देण्यात आली. मे महिन्यात वेगाने घट होणाऱ्या लसीकरणाच्या आकडेवारीमुळे राज्य सरकारांना केंद्र सरकारच्या या प्रक्रियेवर पुन्हा नियंत्रण करण्यासाठी विनंती करावी लागली.

याआधी मे ते 20 जून या दरम्यान देशात विकेंद्रीकृत धोरणावर काम केले जात होते. त्याअंतर्गत खासगी रुग्णालये व राज्य सरकारांना 18 ते 44 वयोगटातील 50 टक्के लसची व्यवस्था करावी लागली. तर 45 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील केंद्राकडून ही लस मोफत दिली जात होती. 21 जूनपासून लागू करण्यात आलेल्या नवीन लसीकरण धोरणामुळे 30 जूनपर्यंत म्हणजेच केवळ 10 दिवसात लसीकरणाची गती वाढल्याचे दिसून आले. आकडेवारीनुसार जून महिन्यातील 44 टक्के लसीकरण जून महिन्याच्या दहा दिवसांतच पूर्ण झाले होते.

अजून लसीकरण बाकीदेशात अद्याप वयस्क लोकांचे लसीकरण बाकी आहे. याचबरोबर, जनगणना 2011 च्या अंदाजानुसार, एकूण 136.13 कोटी भारतीय लोकांचे लसीकरण करण्याचे अंतिम लक्ष्य आहे. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 33 कोटी 57 लाख 16 हजार 019 म्हणजेच 35.7 टक्के लोकांचे पूर्ण किंवा अंशतः लसीकरण झाले आहेत. तर, 6.34 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. म्हणजेच, अद्याप भारतात 60 कोटी 44 लाख 83 हजार 981 लोकांनी लस घेतलेली नाही. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या