शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

CoronaVirus: ‘सोशल’ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग शब्द वापरा; पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 07:18 IST

ज्येष्ठ भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

मुंबई : सोशल डिस्टन्सिंग हा शब्द दोन हजार वर्षांपासून आहे. जातीप्रथेच्या नावाखाली अस्पृश्यता म्हणजे विशिष्ट समाजापासून सामाजिक अंतर राखले जाते. त्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ या शब्द प्रयोगाचा वापर केला जायचा. संविधानाने अस्पृश्यता संपुष्टात आणली आणि समाजात वास करून असलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या कुप्रथेला कायमची मूठमाती दिली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची नाही तर सोशल कनेक्शनची गरज लॉकडाउनच्या काळात आहे. परिणामी सोशल डिस्टन्सिंग ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग हा अधिक योग्य शब्द आहे. त्यामुळे भारतातनेही सोशल डिस्टन्सिंग ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग किंवा कोरोना डिस्टन्सिंग या शब्दांचा वापर करावा, असे आवाहन भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.जगभरात समाज शास्त्रज्ञ यांनी याबद्दल आक्षेप घेतल्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेही २० मार्चपासून हा शब्द वापरणे बंद केले आणि सोशल कनेक्टनेस विथ फिजिकल डिस्टन्सिंग या नवीन शब्द प्रयोगाला सुरूवात केली. फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे संशयित रुग्ण आणि इतर यांच्यामध्ये संक्रमण होणार नाही इतके अंतर ठेवणे. यासाठी हवे तर कोरोना डिस्टन्सिंग असा थेट शब्दप्रयोग करणे अधिक युक्त ठरेल. जाती प्रथेची सगळी उतरंड, उच्च निचतेची प्रथा सोशल डिस्टन्सिंगच्या सूत्रावर बांधली गेली आहे. म्हणून राज्य शासनाकडून व प्रसार माध्यमांनी हा शब्द प्रयोग थांबवला पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले. कोरोनानिमित्ताने सोशल कनेक्टची अधिक गरज असताना दिल्लीच्या तबलीग मरकज मधील एका घटनेचे निमित्त करून संबंध कोरोनाला धर्म चिटकवण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न झाला तोही वेदनादायक आणि क्लेशदायक आहे. ते रोखण्यासाठी या देशाचे संविधानिक प्रमुख या नात्याने पंतप्रधान म्हणून पुढाकार घेणे अपेक्षित आहे, असे देवी यांनी पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी