शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यास ७ वर्षांची कैद, ५ लाख दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 06:54 IST

केंद्र सरकारचा वटहुकूम; हल्ला, सामानाची मोडतोड, दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा

नवी दिल्ली : स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, मारहाण करणे अथवा त्यांना वाईट वागणूक देणे अशा निंद्य घटनांची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने यासाठी कडक कायदा करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. १८९७ च्या ‘साथीचे रोग प्रतिबंधक कायद्या’त यासाठी वटहुकूम काढून दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशात हल्लेही वाढल्याने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाºयांना काम करणे मुश्किल झाले होते.माहितीमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा वटहुकूम लागू होईल. कोरोनाविरुद्धच्या युद्धात डॉक्टर व अन्य आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष आघाडीवर लढणारे योद्धे आहेत. त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याची कोणताही घटना अजिबात सहन केली जाणार नाही. डॉक्टर व अन्य कर्मचाºयांवर हल्ला करणे, त्यांच्या सामानाची व वाहनांची मोडतोड करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे.रोगप्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती । कठोर शिक्षेची तरतूदसाधी दुखापत झाल्यास गुन्हेगारास तीन महिने ते पाच वर्षांपर्यंत कैद व ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत दंडगंभीर दुखापत झाल्यास गुन्हेगारास सहा महिने ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवास व एक ता पाच लाख रुपयांपर्यंत दंडडॉक्टरांची वाहने, दवाखाने व अन्य सामानाची मोडतोड झाल्यास बाजारभावाहून दुप्पट भरपाईची वसुलीया गुन्ह्यांचा तपास एक महिन्यात व खटला सहा महिन्यांत निकाली काढण्याचे बंधनअमित शहांशी चर्चेनंतर ‘आयएमए’चे आंदोलन मागे; डॉक्टरांनी दिला होता ‘व्हाइट अ‍ॅलर्ट’मंत्रिमंडळाने या वटहुकुमास मंजुरी देण्याच्या काही तास आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) या देशातील डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या व सर्वात जुन्या व्यावसायी संघटनेशी व्हिडीओ बैठक घेऊन डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.शहा यांनी केलेले आवाहन व दिलेले आश्वासन लक्षात घेऊन ‘आयएमए’ने या हल्ल्यांच्या निषेधार्थ आपले प्रस्तावित आंदोलन मागे घेतले. देशातील डॉक्टर बुधवारी रात्री ९ वाजता मेणबत्ती लावून ‘व्हाइट अ‍ॅलर्ट’ पुकारला होता. सरकारला जाग न आल्यास गुरुवारी ‘काळा दिवस’ पाळणार होते.सध्या वाईट संदेश जाऊ नये यासाठी आंदोलन रद्द करण्यात येत असल्याचे ‘आयएमए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा व मानद सरचिटणीस डॉ. आर. व्ही. अशोकन यांनी जाहीर केले. बैठकीला ‘आयएमए’च्या अन्य पदाधिकाºयांखेरीज केंद्रीय आरोग्य खात्याच्या सचिव प्रीती सुदान व ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल हेही उपस्थित होते.या वटहुकुमातून आरोग्यसेवकांच्या सुरक्षेविषयी सरकारची अतूट प्रतिबद्धता व्यक्त होते. या आरोग्य योद्ध्यांच्या सुरक्षेविषयी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही.-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या