शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचा १४ दिवस दिल्लीतच मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 19:46 IST

Coronavirus Update : लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू; दिवसातून तीन वेळा होते तपासणी

गडचिरोली: अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूपासून बचावासाठी अखेर मायदेशी परतलेल्या चीनमधील भारतीय विद्यार्थ्यांना सध्या दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांना १४ दिवस वैद्यकीय निगराणीखाली राहावे लागणार आहे. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.चीनमधील वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणानिमित्त गेलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या पुढाकाराने विशेष विमानांनी भारतात आणण्यात आले. त्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.गडचिरोलीचे रहिवासी आणि सध्या आमगाव (जि.गोंदिया) येथे कार्यरत असणारे तहसीलदार दयाराम भोयर यांची कन्या सोनाली हिच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तसेच पुणे, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थी भारतात परतले आहेत. त्यांना दिल्लीत आणल्यानंतर तेथील लष्कराच्या रुग्णालयात विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे. तिथे दिवसातून तीन वेळा त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यांच्यापैकी कोणालाही कोरोना व्हायरसची लागण झालेली नसली तरी हा व्हायरस कधीही कार्यरत होण्याची शक्यता पाहता त्यांना १४ दिवस वैद्यकीय निगराणीत ठेवले जात आहे.राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडूनही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून त्यांना धीर देण्यात आला आहे. १४ दिवसांच्या देखरेखीनंतर या विद्यार्थ्यांच्या घरपोच सोडण्याची व्यवस्था सरकारकडूनच केली जाणार असल्याचे सोनाली भोयर हिचे पालक दयाराम भोयर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीन