शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Update: कोरोनाचे नवे रुग्ण ५८ हजारांहून अधिक; दोन लाख जणांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 05:28 IST

ओमायक्रॉनचे दोन हजार बाधित. कोरोनाची सौम्य किंवा मध्यम लक्षणे असणाऱ्यांचा घरातील विलगीकरणाचा कालावधी दहा दिवसांवरून सात दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ५८ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले असून, ५३४ जणांचा मृत्यू झाला आहे. ओमायक्राॅनच्या बाधितांची संख्या २१३५ झाली असून, त्यातील ८२८ जण बरे झाले. नव्या विषाणूचा संसर्ग  २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. 

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असून, त्यानंतर दिल्ली, केरळ. राजस्थान, गुजरात, तमिळनाडूचा क्रमांक लागतो. गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाचे ५८,०९७ नवे रुग्ण सापडले. सक्रिय रुग्णांची आकडेवारी २,१४,००४ झाली आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ०.६१ टक्के आहे. या संसर्गाने आजवर ४ लाख ८२ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ५० लाख १८ हजार ३५८ असून, त्यातील ३ कोटी ४३ लाख २१ हजार ८०३ जण बरे झाले. कोरोनातून आजवर ९८.०१ टक्के जण बरे झाले. दररोजचा व दर आठवड्याचा संसर्गदर अनुक्रमे ४.१८ व २.६० टक्के तसेच मृत्यूचे प्रमाण १.३८ टक्के आहे. देशातील नागरिकांना कोरोना लसीचे आजवर १४७.७२ कोटी डोस देण्यात आले आहेत.

सौम्य लक्षणे असलेल्यांना आता सात दिवस विलगीकरणकोरोनाची सौम्य किंवा मध्यम लक्षणे असणाऱ्यांचा घरातील विलगीकरणाचा कालावधी दहा दिवसांवरून सात दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने प्रतिबंधक उपायांसंदर्भात जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा बदल करण्यात आला. घरातील विलगीकरण संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. 

उपचारांसाठी नवे औषधकोरोना उपचारांमध्ये मोलनुपिराविर या औषधाच्या आपत्कालीन वापराला भारतात परवानगी देण्यात आली आहे. या औषधाची गोळी विषाणूला शरीरात आणखी पसरण्यापासून रोखते. त्यामुळे तब्येत लवकर बरी होण्यास मदत होते. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच या औषधाचा वापर करण्यात यावा अशी सूचनाही देण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या