शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Updates: देशातील कोरोना संकट पुन्हा वाढलं, कालच्या तुलनेत आज तब्बल 12 टक्क्यांनी वाढली रुग्ण संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 11:23 IST

आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी 28 लाख 57 हजार कोरोना बाधित समोर आले आहेत. यापैकी 4 लाख 39 हजार 529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत 3 कोटी 20 लाख 28 हजार लोकांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत झाले आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच, भारतातील कोरोना संकट पुन्हा वाढताना दिसत आहे. कालच्या तुलनेत आज तब्बल 12 टक्के अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी ताजी आकडेवारी जारी केली. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 47,092 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. काल हा  आकडा 41,965 एवढा होता. याचबरोबर, गेल्या 24 तासांत 509 कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 35,181 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच सक्रिय रुग्ण संख्येत एकूण 11,402 ने वाढ झाली आहे. (coronavirus update about new covid cases deaths and recovery)

केरळमध्ये कोरोना रुग्ण संख्या अत्यंत वेगाने वाढताना दिसत आहे. केरळमध्ये बुधवारी तब्बल 32,803 नवे कोरोना बाधित आढळून आले. तर संक्रमणामुळे आणखी 173 जणांचा मृत्यू झाला. या नव्या रुग्णांनंतर येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या 40 लाख 90 हजार 36 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 20,961 वर पोहोचला आहे.

"देशात सर्व मुलांना लस देण्यास नऊ महिने लागतील, शाळा उघडणे आवश्यक"

अशी आहे देशाची स्थिती - आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी 28 लाख 57 हजार कोरोना बाधित समोर आले आहेत. यापैकी 4 लाख 39 हजार 529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत 3 कोटी 20 लाख 28 हजार लोकांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत झाले आहेत. देशातील कोरोना सक्रीय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. सध्या, 3 लाख 89 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एकूण कोरोना रुग्ण - तीन कोटी 28 लाख 57 हजार 937एकूण डिस्चार्ज- तीन कोटी 20 लाख 28 हजार 825एकूण सक्रिय रुग्ण - तीन लाख 89 हजार 583एकूण मृत्यू - चार लाख 39 हजार 529एकूण लसीकरण- 66 कोटी 30 लाख 37 हजार डोस देण्यात आले 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलKeralaकेरळ