शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: अंधाऱ्या खोलीत नेऊन पट्ट्याने कसं मारतात हे मला माहीत आहे, मोदी सरकारमधील मंत्र्याची अधिकाऱ्यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 13:28 IST

आतापर्यंत काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप कमी प्रमाणात दिसून येत होता. पण आता छत्तीसगडसारख्या राज्यांमध्येही कोरोनाचे संकट आता गंभीर रूप धारण करत आहे.

रायपूर - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशासमोर निर्माण झालेले आव्हान दिवसेंदविस अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. मात्र आतापर्यंत काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप कमी प्रमाणात दिसून येत होता. पण आता छत्तीसगडसारख्या राज्यांमध्येही कोरोनाचे संकट आता गंभीर रूप धारण करत आहे. दरम्यान, कोरोनाचे आव्हान उभे असतानाच मोदी सरकारमधील एका मंत्र्याने क्वारेंटाईन सेंटरमध्ये जात दोन अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी छत्तीसगडमधील बलरामपूर येथील क्वारेंटाईन सेंटरला भेट दिली. त्यानंतर तिथे गेल्यावर त्यांनी क्वारेंटाईन सेंटरमधील अधिकाऱ्यांना धमकी दिली. अंधाऱ्या खोलीत नेऊन बेल्टने कसे मारतात, हे मला माहित आहे, अशी धमकी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, त्यांनी दिलेल्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

केंद्रीय मंत्री रेणुका सिंह बलरामपूर येथील क्वारेंटाईन सेंटरची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी अधिकाऱ्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, इथे दादागिरी चालणार नाही. इथे आमचं सरकार नाही, असं कुठल्या अधिकाऱ्याने समजू नये. आम्ही १५ वर्षे सरकार चालवले आहे. आम्ही राज्यातून उपासमार, नक्षलवाद आणि निरक्षरतेला पळवून लावले आहे. या राज्यात आम्ही विकास केला आहे. भारत सरकारकडे पैसे आणि इच्छाशक्तीची कुठलीही कमतरता नाही आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना कमकुवत समजू नका. तुम्ही भाजपा कार्यकर्त्यांसोबत जो भेदभाव करताय तो विसरा, अंधाऱ्या खोलीत नेऊन पट्ट्याने कसे मारतात हे मला ठावूक आहे, अशी धमकी त्यांनी दिली.

 छत्तीसगडमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या  वाढली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे २५२ रुग्ण सापडले आहेत. पैकी ६७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १८५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर छत्तीसगडमध्ये आतापर्यंत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChhattisgarhछत्तीसगडIndiaभारतGovernmentसरकारBJPभाजपा