शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : महाराष्ट्र अन् केरळनं वाढवलं देशाचं टेन्शन; आज सायंकाळी होणार महत्वाची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 17:04 IST

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत या दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल.

नवी दिल्ली - कोरोना महामारीचा धोका अद्यापही संपलेला नाही. केरळ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत कोरोनाचे नवे रुग्ण समोर येतच आहेत. महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला आणि आरोग्य सचिव राजेश भूषण केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हर्च्यूअल बैठक घेणार आहेत. (CoronaVirus union home secy and health secretary will hold virtual meet for rising corona cases in kerala and maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत या दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल.

कोरोनावरील लसीच्या बुस्टर डोसची किती गरज? AIIMS चे संचालक डॉ. गुलेरियांनी स्पष्टच सांगितलं

केरळची स्थिती -दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री व्ही मुरलीधरन गुरुवारी म्हणाले, की केरळ सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. मात्र, राज्य सरकारचे लक्ष मोपला बंडाच्या वर्धापन दिनावर आहे. केरळमध्ये बुधवारी तब्बल 31,445 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. याच बरोबर, केरळमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3,883,429 वर पोहोचली आहे. तर 215 रुग्णांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांचा आकडा 19,972 वर पोहोचला आहे. तसेच संक्रमण दर वाढून 19.03 टक्के झाला आहे. यापूर्वी, केरळमध्ये एकाच दिवसात 30,000 हून अधिक रुग्ण 20 मे रोजी नोंदविले गेले होते. तेव्हा एकाच दिवसात 30,491 नवे रुग्ण समोर आले होते. 

CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित       महाराष्ट्राची स्थिती -मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यात 5 हजार 031 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत 216 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 4 हजार 380 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 62 लाख 47 हजार 414 रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण 50 हजार 183 इतकी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्रKeralaकेरळ