शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोटा येथे अडकले राज्यातील दोन हजार विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 04:49 IST

सुटकेसाठी लोकप्रतिनिधींशी संपर्क; स्पर्धा परीक्षेसाठी गेले, लॉकडाउनमुळे रखडले

मुंबई : आयआयटी, मेडिकलसारख्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवेश परीक्षेच्या अभ्यासासाठी राजस्थानातील कोटा येथे गेलेले राज्यातील सुमारे दोन हजार विद्यार्थी लॉकडाउनमुळे तेथेच अडकून पडले आहेत. तेथे त्यांची गैरसोय होत असून महाराष्ट्रात येण्यासाठी ते आपापल्या विभागातील आमदार, खासदारांकडे पाठपुरावा करत असून त्यांच्याकडून केवळ आश्वासनेच मिळत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.लॉकडाउन लांबल्यानंतर केंद्र सरकारने राजस्थान सरकारला जे राज्य त्यांच्या विद्यार्थ्यांना परत नेण्याची इच्छा दर्शवित आहेत त्यांना परवानगी द्यावी अशी सूचना केली होती. त्यानुसार राजस्थान सरकारने सहकार्यही केले. यामुळे उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश सरकारने आपल्या विद्यार्थ्यांना विशेष बसगाड्यांनी स्वगृही आणले. मात्र राज्यातील विद्यार्थी अजूनही तेथे अडकले आहेत.काही विद्यार्थी हॉस्टेलमध्ये तर, काही पेर्इंगगेस्ट म्हणून राहात आहेत. राजस्थान सरकारकडून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात येत असली तरी त्यासाठी विद्यार्थ्यांना तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. यामुळे लवकरात लवकर आमची सुटका करावी, इतर राज्यातील सरकारने त्यांच्या विद्यार्थ्यांना परत नेले. त्यामुळे आम्हालाही सरकारने महाराष्ट्रात परत नेण्याची व्यवस्था करावी, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.सरकार प्रयत्नशीलमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधला आहे. दोन्ही सरकार मिळून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लवकरच विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यात येईल असे टिष्ट्वट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विद्यार्थ्यांना राज्यात आणण्याची सोय करावी असे टिष्ट्वट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या