शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: गोवा, मणिपूरपाठोपाठ त्रिपुराही संसर्गमुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 06:56 IST

दोन्ही रुग्ण झाले पूर्णपणे बरे; मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांची घोषणा, तरीही लॉकडाऊनचे काटेकोर पालन करणार

आगरतळा : गोवा व मणिपूर ही राज्ये काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गापासून मुक्त झाल्यानंतर त्रिपुरानेही आता हे यश मिळविले आहे. त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.त्रिपुरामध्ये कोरोना विषाणूची बाधा झालेले दोन रुग्ण आढळून आले होते. पहिल्या रुग्णावरील उपचारांनंतर केलेल्या वैद्यकीय चाचणीत तो संसर्गमुक्त झाल्याचे दिसले होते. आता दुसऱ्या रुग्णाच्या वैद्यकीय चाचणी अहवालातही हाच निष्कर्ष काढण्यात आला आहे.मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी म्हटले आहे की, त्रिपुरा कोरोना विषाणूमुक्त झाले असले तरी जनतेने लॉकडाऊनच्या निर्बंधांचे यापुढेही काटेकोर पालन केले पाहिजे. कोरोना विषाणूपासून होणाºया ‘कोविड-१९’ या रोगाची साथ पुन्हा पसरू नये, म्हणून प्रत्येकाने फिजिकल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे.महत्त्वाचे कारण नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे. जनतेने आतापर्यंत ही दक्षता घेतल्यामुळेच त्रिपुरा कोरोनापासून मुक्त झाला आहे. तशीच स्थिती यापुढेही कायम ठेवायची आहे. त्रिपुरातील कोरोनाचा पहिला रुग्ण ही एक महिला होती. गोमती जिल्ह्यातीलउदयपूर या गावी राहणारी ही महिला लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी गुवाहाटी येथून त्रिपुरामध्ये परतली होती. तिला कोरोनाची बाधा झाल्याचे सहा एप्रिलला आलेल्या वैद्यकीय चाचणीच्या अहवालातून सिद्ध झाले होते. त्रिपुरामध्ये सध्या कोरोनाच्या १११ संशयित रुग्णांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे, तर २२२ जणांना त्यांच्या घरातच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)दोन्ही रुग्ण उपचारानंतर बरे झालेत्रिपुरा हे कोरोना विषाणूमुक्त झालेले देशातील तिसरे राज्य आहे. याआधी गोव्याने ही कामगिरी फत्ते केली होती. गोव्यात कोरोनाचे सात रुग्ण होते. त्यातील ६ जण दुसºया प्रांतात प्रवास करून राज्यात परतले होते. तर एकाला त्याच्या भावापासूनच बाधा झाली होती. गोवा ३ एप्रिल रोजी संसर्गापासून मुक्त झाले. त्यापाठोपाठ मणिपूर कोरोनामुक्त झाले. तिथे असलेले या आजाराचे दोन रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या