शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

coronavirus: आठ देशांतून हजारो भारतीय परतले, १२ देशांतील १५ हजारांहून अधिक भारतीयांना १३ मेपर्यंत ६४ विशेष विमानांनी आणणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 2:01 AM

पहिल्या टप्प्यात संयुक्त अरब अमिरातींमधून अनुक्रमे १७९ व १७७ भारतीय नागरिकांना परत घेऊन आलेली दोन विशेष विमाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चेन्नई येथे पोहोचली. त्यानंतर रविवारी पहाटेपर्यंत आणखी सात देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आलेली आठ विमाने मायदेशी परतली.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे परदेशांत अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या विशेष विमानांनी व नौदलाच्या युद्धनौकांनी मायदेशी परत आणण्याच्या अनुक्रमे ‘वंदे भारत’व ‘सागरसेतू’ या मोहिमांतर्गत शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून रविवारच्या पहाटेपर्यंत आठ देशांतून हजारो नागरिकांना देशातील विविध शहरांमध्ये सुखरूपपणे परत आणण्यात आले.याच्या पहिल्या टप्प्यात संयुक्त अरब अमिरातींमधून अनुक्रमे १७९ व १७७ भारतीय नागरिकांना परत घेऊन आलेली दोन विशेष विमाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चेन्नई येथे पोहोचली. त्यानंतर रविवारी पहाटेपर्यंत आणखी सात देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आलेली आठ विमाने मायदेशी परतली. या विमानांनी ढाक्याहून दिल्लीला, कुवेतहून हैदराबादला, मस्कतहून कोचीनला, शारजाहून लखनऊला, कुवेतहून कोचीनला, कुआलालंपूरहून त्रिचीला, लंडनहून मुंबईला, तर दोहाहून कोचीनला अडकलेल्या भारतीयांना आणून सोडले.‘वंदे भारत’ मोहिमेत एकूण १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना १३ मेपर्यंत एकूण ६४ विशेष विमानांनी मायदेशी परत आणण्यात येणार आहे. त्यानंतरच्या आठवड्यात या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात कझागस्तान, उझबेगिस्तान, रशिया, जर्मनी, स्पेन व थायलंड येथील भारतीयांना परत आणले जाणार आहे.सुरतमध्ये स्थलांतरितमजूर पुन्हा रस्त्यावरसुरत : राज्य सरकारकडून घरी परत जाण्याची व्यवस्था केली जात नसल्याच्या निषेधार्थ शेकडो स्थलांतरित कामगारांनी शनिवारी सुरत जिल्ह्यात हिजिरा औद्योगिकपट्ट्यातील मोरा गावी रस्त्यावर येऊन निदर्शने व दगडफेक केली. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. पोलिसांनी ३० दंगलखोर कामगारांना ताब्यात घेतले. सुरत जिल्ह्यात बिहार, उत्तर प्रदेश व ओडिशाहून आलेले हजारो स्थलांतरित कामगार अडकून पडले आहेत. उद्योजकांच्या दबावाला बळी पडून राज्य सरकार घरी जाऊ इच्छिणाऱ्या या कामगारांना मुद्दाम डांबून ठेवत आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा यांनी केला.२२५ बिहारी कामगारांनातेलंगणने परत आणलेहैदराबाद : होळीसाठी घरी गेलेल्या; परंतु ‘लॉकडाऊन’मुळे तेथेच अडकून पडलेल्या बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील २२५ कामगारांना तेलंगण सरकारने विशेष ‘श्रमिक’ रेल्वेगाडीची सोय करून राज्यात परत आणले. या सर्व कामगारांचे प्रवासाचे भाडे तेलंगण सरकारने भरले. बिहारहून आलेल्या रेल्वेतून हे कामगार लिंगमपल्ली स्टेशनवर उतरले तेव्हा नागरी पुरवठामंत्री गंगुला कमलाकर यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. हे कामगार गेली अनेक वर्षे तेलंगणमधील भात सडण्याच्या गिरण्यांमध्ये काम करणारे आहेत. अशाच प्रकारे इतर राज्यांमधूनही कामगारांना तेलंगणमध्ये सन्मानाने परत आणले जाईल, असे तेलंगण राष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष पल्ला राजेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत