शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Delhi on the Way Of Lockdown: सर्व हॉटेल, खासगी ऑफिस बंद करण्याचे आदेश; दिल्ली लॉकडाऊनच्या दिशेने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 11:47 IST

Delhi on the Way Of Lockdown: कोरोना सोबत जगावे लागेल असे पहिला लॉकडाऊन उठविताना म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीची पावले तिसऱ्या लाटेमध्ये हळूहळू लॉकडाऊनकडे पडू लागली आहेत. थोड्याच वेळात अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेणार आहेत, परंतू त्याच्या तासभर आधीच दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंटने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. 

देशाची राजधानी दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी दोन आकडी असलेली कोरोना रुग्णसंख्या अचानक काही हजारांवर गेल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना सोबत जगावे लागेल असे पहिला लॉकडाऊन उठविताना म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीची पावले तिसऱ्या लाटेमध्ये हळूहळू लॉकडाऊनकडे पडू लागली आहेत. थोड्याच वेळात अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेणार आहेत, परंतू त्याच्या तासभर आधीच दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंटने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. 

यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खासगी कार्यालये बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीला ही कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने ही कार्यालयेच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यानंतर दिल्लीमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट देखील बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फक्त घरपोच सेवा सुरु राहणार आहे. पत्रकार, सरकारी कार्यालयांतील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आदी लोकांना त्यांच्या आयडी कार्डवर फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. या अत्यावश्यक सेवांशी संबंधीत कार्यालये सुरु ठेवण्यास परवानगी आहे. देशात आणि राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. भारतात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूचे १,६८,०६३ नवीन रुग्ण आढळले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली